यमक अलंकार (Yamak Alankar):
सदा सर्वदा योग तुझा घडावा ।
तुझे कारणी देह माझा पडावा।।
वरच्या ओळीतला अखेरचा शब्द 'घडावा' तर खालच्या ओळीमधला शेवटचा शब्द आहे 'पड़ावा'. दोन्ही ओळींमध्ये शेवटच्या शब्दांत 'डावा' ही अक्षरे आली आहेत. म्हणजे इथे दोन्ही चरणात अखेरीस 'यमक' जुळले असे म्हणतात, वेगवेगळे अर्थ असणाऱ्या; परंतु उच्चारात समानता असणाऱ्या शब्दाचा वापर चरणात ठरावीक ठिकाणी केल्यामुळे कवितेत नाद निर्माण होतो त्यामुळे कवितेस सौंदर्य प्राप्त होते यालाच 'यमक'असे म्हणतात.
यमकचे तीन प्रकार आहेत.i) आद्य चमक ii) दाय यमक iii) पुष्प यमक
आद्य यमक:-
आद्य यमकात ओळीच्या सुरुवातीच्या अक्षरात यमक जुळवलेले असते.उदाहरणार्थ:-
- सुर समस्त इच्या दृढनिश्चये।
सुरस मस्त असे वदले स्वये।।
दाम यमक:-
दाम म्हणजे दावे, दोरे. एका चरणाच्या शेवटची दोन अक्षरे दाव्याने बांधल्याप्रमाणे पुढच्या चरणाच्या आरंभी येतात तेव्हा त्याला 'दाम यमक' म्हणतात. म्हणजेच दाम यमक मध्ये यमक हे कवितेच्या पहिल्या ओळीच्या शेवटी व दुसर्या ओळीच्या सुरूवातीला साधलेले असते.उदाहरणार्थ:-
- आला वसंत कविकोकिल हाही आला।
आलापितो सुचवितो अरुणोदयाला ।।
वरील उदाहरणात पहिल्या ओळीतील शेवटचा शब्द 'आला' याचा यमक दुसर्या ओळीतील सुरूवातीचे शब्द आलापितोतील 'आला' सोबत जुळवले आहे. म्हणून हे दाम यमकाचे उदाहरण आहे. पण त्याच बरोबर पहिल्या ओळीतील पहिला शब्द 'आला' आणि दुसर्या ओळीतील सुरूवातीचे शब्द आलापितोतील 'आला' यामध्ये सुद्धा यमक पाहायला मिळतो म्हणून हे आद्य यमकाचे सुद्धा उदाहरण आहे.
अंत्य यमक:-
प्राचीन, अर्वाचीन आणि काही नव्या कवींनाच नव्हे तर अनेक गीतकारांना आवडणारा असा यमकचा प्रकार म्हणजे अंत्य यमक होय. अंत्य यमकात ओळींच्या शेवटच्या अक्षरांमध्ये यमक साधलेले असते.
उदाहरणार्थ
- सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो ।
कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो।
स्पष्टीकरण:- वरील चरणात ओळीच्या शेवटच्या अक्षरात यमक आले आहे. येथे घडो, पडो, झडो, आणि नावडो या अक्षरात 'डो' हा यमक जुळवलेला आहे. - मना सज्जना भक्तिपंथेची जावे ।
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे ।।
स्पष्टीकरण:-वरील चरणात ओळीच्या शेवटच्या अक्षरात जावे आणि स्वभावे मध्ये यमक आलेला आहे. - कोणी दिला जिव्हाळा, कोणास ताप झाला ।
हसले दुरून कोणी, जवळुन वार केला ।।
स्पष्टीकरण:- वरील चरणात झाला आणि केला मध्ये यमक आहे. - नसे ठावा ब्रह्मा, न शिव अथवा श्रीपति हरी।
हरी जो पापाने उसळुनि कृपा सिंधुलहरी।।
स्पष्टीकरण:- वरील ओळींतील पहिल्या ओळीच्या शेवटचा शब्द हरी आणि दुसर्या ओळीतील शेवटचा शब्द सिंधुलहरी मध्ये यमक आले आहे. म्हणून हे अंत्य यमकाचे उदाहरण आहे. (टीप: तसेच वरील ओळींतील पहिल्या ओळीच्या शवटचा अक्षर 'हरी' म्हणजे विष्णू व दुसर्या ओळीतील पहिला शब्द 'हरी' म्हणजे हारणारा या दोन ओळीत सुद्धा यमक आहे. म्हणून हे दाम यमकचे देखील उदाहरण आहे.)
अशाप्रकारे यमक म्हणजे सारखे उच्चार असलेले अक्षरे कवितेच्या चरनात किंवा ओळी. कवितेत यमक असल्यामुळे कवितेला सौंदर्य प्राप्त होते. आद्य यमक, दाम यमक आणि अंत्य यमक हे तीन यमकाचे प्रकार आहेत. त्यांची विविध उदाहरणे व त्यांचे स्पष्टीकरण येथे दिलेले आहे.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा