गोपाळ गणेश आगरकर
एक थोर क्रांतीकारी समाजसुधारक (social reformer),शिक्षणतज्ञ (educationist),स्त्री-पुरूष समानतेचे पुरस्कर्ते, पुरोगामी नेते, सामाजिक भान ठेवून जन-जागृती करणारे निर्भिड पत्रकार, आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृती निर्माण करण्यात त्यांचे महत्त्वाचं योगदान देणारे,बुद्धिप्रामाण्य वादाचे पुरस्कर्ते, विचारवंत (thinker) म्हणजे गोपाळ गणेश आगरकर.
गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कराड तालुक्यातील (जिल्हा : सातारा) टेंभू या गावी १४ जुलै १८५६ रोजी झाला.त्यांच्या वडिलाचे नाव गणेशराव होते, तर आईचे नाव सरस्वती होते. तर त्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण कराड येथे मामाकडे झाले. आगरकर यांच्या घराचे परिस्थिती बेताची होती, त्यामुळे पुढील शिक्षणाकरिता त्यांच्याकडे पैसे नव्हते. बी. ए. आणि एम. ए. चे शिक्षण पूर्ण करण्याकरिता त्यांनी नोकरी करण्याचे ठरविले आणि कधी मामलेदारचे काम तर कधी कचेरीत उमेदवारी करून, तर कधी कंपाउंडरचे काम आणि वेळ पडल्यास त्यांनी मधुकरी मागून त्यांनी आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण अकोल्याला पूर्ण केले. नोकरी बरोबरच वर्तमानपत्रात लिखाण करणे, शिष्यवृत्ती मिळवणे, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यांत भाग घेऊन बक्षिसे जिंकणे अशा प्रकारे त्यांचे जीवन चरितार्थ चालत असे. १८७८ मध्ये त्यांनी त्यांची बी.ए. आणि १८८१ मध्ये एम.ए. इतिहास व तत्वज्ञान या विषयात पदवी प्राप्त केली.
लोकमान्य टिळक आणि आगरकर
लो. टिळक आणि आगरकर यांचे स्नेह-संबंध
डेक्कन कॉलेजमध्ये शिकत असताना आगरकर यांची १८७९ मध्ये लोकमान्य टिळक यांच्याशी एम. ए. करताना भेट झाली. नंतर भेटीचे रूपांतर मैत्रीत झाले.टिळक आणि आगरकर यांचे स्नेहाचे आणि जवळचे नाते होते. विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक व आगरकर यांनी १ जानेवारी १८८० मध्ये पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी १८८१ मध्ये आर्यभूषण छापखाना काढला. तसेच त्रयींनी मिळून २ जानेवारी १८८९ रोजी मराठा व ४ जानेवारी १८८९ रोजी केसरी या वृत्तपत्राची सुरुवात केली. केसरी हे मराठी तर मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र होते.आगरकर हे केसरीचे संपादक होते तर टिळक मराठ्यांचे संपादक होते. वृत्तपत्रांच्या माध्यमातून राजकीय आणि सामाजिक जागृती, लोकशिक्षण व शासकीय अन्यायाचा प्रतिकार करणे हे त्यांचे ध्येय होते.
डोगरीचा तुरुंग (बर्वे प्रकरण)
कोल्हापूर संस्थानचे दिवाण माधवराव बर्वे यांच्यावर केसरी व मराठ्यातून अनेक लेख प्रसिद्ध झाले. बर्वे यांच्या कारभारावर वृत्तपत्रातून टीका केली. साताऱ्याच्या छत्रपतींना पागल ठरवण्याचा बर्वे व इंग्रज सरकारचा डाव आहे. असे आरोप देखील आगरकर आणि लो. टिळक यांनी केले. त्याबद्दल त्यांनी केसरी आणि मराठा मध्ये लिखनही केले. बर्वे यानी दोघांवर अब्रुनुकसानीची दावा केला. दोघांना त्यांनी केलेले आरोप सिद्ध करता न आल्यामुळे त्यांना चार महिन्यांची म्हणजे १२० दिवसांची शिक्षा झाली. त्याबद्दल टिळक व आगरकर यांना डोंगरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. चांगल्या वर्तणुकीबद्दल त्यांची शिक्षा १९ दिवसांनी कमी करण्यात आली. १०१ दिवस शिक्षा भोगून २६ ऑक्टोबर १८८२ रोजी त्यांची सुटका झाली. डोंगराच्या तुरुंगात लो. टिळक आणि आगरकर एकूण १०१ दिवस शिक्षा भोगली. या तुरुंगातील शिक्षेवर, टिळक व आपल्या मधील स्नेह संबंधावर आगरकर यांनी 'डोगरीच्या तुरुंगातील १०१ दिवस' हे पुस्तक लिहिले.
टिळक आणि आगरकर मधील मतभेद
लो. टिळकांच्या मते आधी राजकीय स्वातंत्र्य मिळवावे त्यानंतर सामाजिक सुधारणा करता येईल. स्वतंत्र मिळाल्यानंतर विविध कायदे करून सामाजिक सुधारणा घडवून आणली जाऊ शकते. तर आगकरांचे मते सामाजिक सुधारणेला अधिक महत्त्व द्यायला हवे. आधी सामाजिक सुधारणा की आधी राजकीय स्वतंत्र यावरून दोघांमध्ये मतभेद होते. त्यामुळे एखादे नवीन वृत्तपत्र सुरू करावे आणि त्यात लिखाण करावे असा विचार त्यांच्या मनात घोळत होता. याची जाणीव लो.टिळकांनाही झाली.पण आगरकरांनी स्वतंत्र वर्तमानपत्र काढून दोघांमधील मतभेद स्पष्ट न करता केसरीतच स्वंतत्रपणे आपले नाव लिहून आपले विचार मांडले असे लो. टिळकांना वाटे. या बाबतीत टिळकांनी आगरकरांनी पूर्ण स्वतंत्र दिले होते. यात टिळकांना काहीच हरकत नव्हती. सुरुवातीच्या काळात आगरकरांनी तेही केले. आगरकरांचे सर्व लेख कोणतीही काटछाट न करता केसरी मध्ये छापण्यात येत असे. विशेष बाब म्हणजे अग्रलेखाविरोधात भूमिकाही त्यात असत, आणि टिळकही त्या छापत. फीमेल हायस्कुलातील शिक्षणक्रम या नावाने केसरीच्या अग्रलेखाहून मोठा लेख आगरकरांनी लिहिला. यापूर्वी केसरीने छापलेल्या चार अग्रलेखांचा प्रतिवाद करणारा हा लेख केसरीनेही काटछाट न करता छापला. दोघांमधील व्यावसायिक आणि स्नेह संबंधाचे हे एक उदाहरण होय. पण त्यातच संमतीवय आणि बालविवाहाच्या प्रश्नावर त्यांचे मतभेद वाढले. सहाजिकच केसरीतून सुधारणावादी मते मांडताना आगरकरांची कुचंबणा होऊ लागली. यामुळे नाईलाजास्तव आगरकरांनी केसरी सोडली.
राजकीय व सामाजिक कार्य
- 'इष्ट ते बोलणार व साध्य असेल ते करणार' हे आगरकरांचे ब्रीदवाक्य होते व तेच केसरी वृत्तपत्राचे शीर्षक होते. (IPS पूर्व २००८)
- २४ ऑक्टोबर १८८४ - डेक्कन एज्यूकेशन सोसायटीची स्थापना केली.
- १८८५ मध्ये डेक्कन एज्यूकेशन सोसायटीद्वारा फर्ग्यूसन कॉलेजची निर्मिती केली.
- फर्ग्यूसन कॉलेजचे पहिले प्राचार्य वा. शि. आपटे होते, त्यानंतर १८९२ ते १८९५ पर्यत आगरकर प्राचार्य होते.(PSI - 2002)
- २५ ऑक्टोबर १८८७ केसरीचे संपादक पद सोडले व १५ ऑक्टोबर १८८८ दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर 'सुधारक' हे साप्ताहिक सुरू केले. सुधारक हे इंग्रजी व मराठी दोन्ही तून प्रकाशीत होत होते. यातील मराठी विभागाचे लेखन आगरकर करीत तर इंग्रजी विभागाचे लेखन गोपाळ कृष्ण गोखले करीत. (PSI पूर्व २०००)
- 'इष्ट ते बोलणार व साध्य असेल ते करणार'हे त्यांचे ब्रीदवाक्य सुधाकर वृत्तपत्रावरही होते.
- 'व्यक्तीस्वातंत्र्य' हे आगरकरांच्या विचाराचे वैशिष्टय होय.
- ते जिवंत असतांना सनातनी लोकांनी त्यांची प्रेतयात्रा काढली.
- 'जॉन स्टुअर्ट मिल आणि हर्बर्ट स्पेन्सर' यांच्या विचाराचे संस्कार आगरकर यांच्यावर होते.
- इंग्रज भारतात येण्यापूर्वीचा भारतीय समाज हा शिलावस्थेत होता असे त्यांचे मत होते. म्हणून इंग्रज भारतात येण्यापूर्वीच्या समाजाचे शिलावस्था असे वर्णन करतात.
- आगरकरांना बुद्धिवादाचे जनक समजले जाते. फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य शिवराम आपटे यांच्या मृत्युनंतर त्यांच्या पत्नीने केशवपन केले हे पाहून आगरकर दुःखी झाले त्यांनी आपल्या मृत्युनंतर केशवपन करणार नाही म्हणून पत्नी यशोदाबाईकडून शपथ घेतली.
- बालविवाहास विरोध करण्यासाठी 'महाराष्ट्र बालविवाह निषेध मंडळ स्थापण केले.
- १८८१-८२ च्या समती वयविधेयकास त्यांचा पाठिंबा होता.
- विचारकलह हा समाजस्वास्थाला आवश्यक असेल्यांचे त्यांचे मत होते.
- पुणे महानगर पालिकेच्या हौदावर ब्राह्मणांसाठी व शुद्रांसाठी असे दोन फलक लावलेले होते. यावर टीका करतांना त्यांनी म्युनसिपल हौद व ब्राह्मणावर गदा' हा लेख लिहिला.
- त्यांच्या आधुनिक विचार आणि अनिष्ट रूढी परंपरा यावर केलेल्या टीकेमुळे सनातनी लोक त्यांच्यावर अतिशय नाराज होते. त्यामुळे सनातनी लोकांनी त्यांची जिवंतपणी प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली होती. 'फुटके नशीब' हे त्यांचे आत्मचरीत्र यात ते लिहितात "मी एकमेव असा समाजसुधारक आहे ज्याने स्वत:च्या डोळ्याने स्वतःचाच अंत्यविधी पाहिला."
- वयाच्या ३९ वर्षी १७ जून १८९५ ला पुणे येथे अस्थमा मुळे त्यांचा मृत्यू झाला. मृत्युपूर्वी त्यांनी प्रेत दहनासाठी परचुंडीत २० रु. बांधून ठेवले.
- त्यांच्या मृत्युनंतर सुधारक के वृत्तपत्र देवघर पटवर्धन व त्यानंतर रामचंद्र विष्णू यानी चालवले.
- आगरकरांना ईश्वरांचे अस्तित्व मान्य नव्हते. त्यामुळे वि.स. खांडेकर त्यांचे वर्णन ' देव न मानणारा देव माणूस' असा करतात. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आचार्य अत्रे यांनी पुण्यात १९३४ साली आगरकर हायस्कूल मुलींची शाळा सुरु केला.
- ANIS तर्फे 'सुधारक'कार गो.ग- आकरकर हा पुरस्कार दिला जातो. २०१० रोजी हा पुरस्कार डॉ. श्रीराम लागू यांना तर २०१२ सय्यदभाई यांना देण्यात आला.★
लेखन व कार्य
- 'डोगरीच्या तुरुंगातील १०१ दिवस' हे पुस्तक लिहिले. यात लोकमान्य व आगरकरांचे मनोमिलन व सहृदय मैत्रीचे चित्रण करण्यात आले आहे.
- शेक्सपिअरच्या 'हँम्लेट' नाटकाचे मराठी मध्ये 'विकार विलसीत' असे भाषांतर केले.
- 'स्त्रियांनी जाकिटे घातलीच पाहिजे' हा स्त्री - पुरुष समानता व स्त्रियांचे हक्क यावरील लेख लिहिला.
- गुलामांचे राष्ट्र- या लेखात भारतीय लोकांच्या भित्री वृत्ती, आळशीपणा परीश्रमाचा कंटाळा इ. दुर्गुणांचा समाचार घेतला.
- 'हिंदूस्थानचे राज्य कोणासाठी' - इंग्रजांच्या स्वार्थी वृत्तीवर टिका केली. इंग्रज भारतीयांना कश्या प्रकारे लुटत आहेत याचे वर्णन केले.
- वाक्य मिमांसा व वाक्याचे पृथ्याकिकरण'(१८८८) केसरीतील निवडक निबंध यामधे आहेत.
- गुलामगीरीचे शस्ञ, जात्युच्छेदक निबंध, शेठ माधवदास रघुनाथ व. धनकुवरबाई यांचे पुनर्विवाह चरीत्र
- सुधारकातील वेचक लेख - १८९५.
- विविध लेख'अनाथाचा कोणी वाली नाही?'
- मुलाइतकीच मुलींच्या शिक्षणाची सक्ती - सुधारक स्त्रियांना वरिष्ठ प्रतीचे शिक्षण द्यावे की नाही? सुधारक सुधारकच्या पहील्या अंकात गुलामांचे राष्ट्र - राष्ट्रीय ऐक्यासाठी आवश्यक गुण आपल्यात नसल्याबाबतचा लेख.
- सामाजिक सुधारणेस अत्यंत अनुकूल काळ : सांप्रत काळ
- इंग्रजांच्या कोणत्या गोष्टी अनुकरणीय आहेत.
- वाचाल तर चकीत व्हाल - या लेखात त्यांनी आकडेवारी सह आपल्या देशातील दरिद्राचे प्रमाण दाखवून दिले.
- शहण्यांचा मुर्खपणा :- सक्तीच्या वैध्यव्यावर टिका केली
- आमच्या स्त्रियांचे पेहराव : लेख आम्हा पुरुषांचा पेहराव श्लेख अलंकार मीमांसा, दांगिन्याचा सोस
- दारुबाजी - दारूमुळे होणारे दुष्परीणाम सांगीतले
- पाचजन्यांचा हंगामा - या लेखात देशातील बीभत्स सणावर टिका त्यामध्ये 'शिमगा' या सणाचा उल्लेख प्रथम केला.
- धर्माचा सुकाळ आणि बकऱ्या चा काळ
- आमचे अजून ग्रहण सुटले नाही
- प्रेतक्रीया व प्रेत संस्कार →
- दत्तकाची आवश्यक
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा