व्यतिरेक अलंकार:-
उपमेय हे उपमानापेक्षाही सरस असते, त्यापेक्षाही अधिक चांगले असते, एखाद्या गुणाच्या बाबतीत उपमेय उपमानापेक्षाही सरस असल्याचे जेथे वर्णन केलेले असते तेथे 'व्यतिरेक' हा अलंकार होतो. व्यतिरेक म्हणजेच आधिक्य. उपमेयाचे उपमानावर आधिक्य म्हणजेच व्यतिरेक होय. हे आधिक्य दोन प्रकारांनी दाखवता येते १) उपमेहाच्या उत्कर्षाने २) उपमानाच्या अपकर्षाने.
उदाहरणार्थ:-
- अमृताहुनी गोड नाम तुझे देवा
- कामधेनूच्या दुग्धाहूनही ओज हिचे बलवान
- तू माऊलीहून मायाळ चंद्राहूनही शीतल
पाणियाहूनही पातळ कल्लोळ प्रेमाचा. - चंद्राची युवती मुखास उपमा देती कशाला कवी,
हे पूर्वी न मला रहस्य कळले,
चित्रातले हे मुख पाहूनी मजला अपूर्ण ची गमे
चंद्रास हे लाजवी की त्याच्यावर निष्कलंक विहरे बुद्धसवे कौतुके - सावळा ग रामचंद्र रत्न मंचकी झोपतो त्याला पाहता लाजुन चंद्र आभाळी लोपतो
स्पष्टीकरण :- या वाक्यात परमेश्वराचे नाव हे उपमेय आणि त्याची तुलना अमृताच्या गोडीशी केली आहे इतकेच नव्हे तर परमेश्वराचे नाव ही गोडीच्या बाबतीत अमृता पेक्षाही वरचढ आहे असे भरलेले आहे म्हणून उपमेय आहे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन येथे केलेले आहे म्हणून हा व्यतिरेक अलंकार होय.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा