वचन: एकवचन आणि अनेकवचन | वचन बदल विविध नियम

वचन

  1. वचन म्हणजे काय?

    नामाच्या ठिकाणी संख्या सूचनाचा जो धर्म असतो त्याला 'वचन' असे म्हणतात. कोणत्याही शब्दावरून त्याने दाखवलेल्या वस्तूची संख्या एक (one) आहे, की अनेक किंवा एका पेक्षा अधिक (more than one) आहे, हे समजते. त्यालाच त्या शब्दाचे 'वचन' असे म्हणतात. वस्तू एक आहे का अनेक आहेत हे आपल्याला वचनावरुन लक्षात येते.

  2. वचनाचे प्रकार किती व कोणते?
  3. वचनाचे दोन प्रकार पडतात - एकवचन आणि अनेकवचन. अनेकवचनालाच 'बहुवचन' असे देखील म्हणतात. जेव्हा एखाद्या शब्दावरून वस्तू एकाच आहे असा बोध होतो, तेव्हा त्या शब्दाला 'एकवचन' मानले जाते. तर जेव्हा एखाद्या वस्तूवरून वस्तू अनेक (एकापेक्षा जास्त) आहेत, असा बोध होतो, तेव्हा त्या शब्दाला 'अनेकवचन' मानले जाते. 'पान' या शब्दावरून एका पानाचा बोध होतो. तर 'पाने' या शब्दावरून अनेक पानांचा बोध होतो. म्हणून 'पान' हे एकवचन आहे, तर 'पाने' हे अनेकवचन आहे. म्हणून तसेच 

    आंबा - एकवचन  आंबे - अनेकवचन

    वही - एकवचन  वह्या - अनेकवचन

    झाड - एकवचन  झाडे - अनेकवचन

    एकवचनाचे अनेकवचनामध्ये तसेच अनेकवचनाचे एक वचनामध्ये रूपांतर करता येते. विविध स्पर्धा परीक्षेत सुद्धा एकवचन-अनेकवचन यावर उदाहरणे आलेले असतात. त्यामुळे हा घटक अभ्यासणे फार महत्त्वाचे आहे. वचनामुळे नावाच्या रूपात खालील प्रमाणे बदल होतो व त्याचे नियम सुद्धा खाली दिलेले आहेत.

    ह्या पोस्ट वाचण्याकरिता क्लिक करा.

    विरामचिन्हे (विरामचिन्हांचा उपयोग)

    शब्दसिद्धी : तत्सम, तद्भव, देसी व परदेशी शब्द

    • नियम १:- 'आ' कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन 'ए' कारान्त होते.
    • उदाहरणार्थ:-
      'आ'कारान्त शब्दाचे वचन बदल करणे
      एकवचन - अनेकवचन एकवचन - अनेकवचन एकवचन - अनेकवचन
      अनारसा - अनारसे झरा - झरे फासा - फासे
      आंबा - आंबे टाका - टाके बोका - बोके
      आत्मा - आत्मे डबा - डबे मासा - मासे
      आरसा - आरसे तवा - तवे रस्ता - रस्ते
      ओढा - ओढे दांडा - दांडे राजा - राजे
      कुत्रा - कुत्रे पंखा - पंखे लांडगा - लांडगे
      कोल्हा - कोल्हे पट्टा - पट्टे वडा - वडे
      घसा - घसे पत्ता - पत्ते वाडा - वाडे
      घोडा - घोडे पाता - पाते ससा - ससे
      चश्मा - चष्मे फळा - फळेचमचा - चमचे
      अंगठा - अंगठे आठवडा - आठवडे कपडा - कपडे
      किनारा - किनारे किल्ला - किल्ले कोंबडा - कोंबडे
      खिसा - खिसे खेकडा - खेकडे गळा - गळे
      गोठा - गोठे चेहरा - चेहरे झोका - झोके
      डोळा - डोळे दवाखाना - दवाखाने धडा - धडे
      धागा - धागे घडा - घडे पावसाळा - पावसाळे
      पिंजरा - पिंजरे पैसा - पैसे बगीचा - बगीचे
      बटाटा - बटाटे महिना - महीने मुलगा - मुलगे
      रुपया - रुपये वक्ता - वक्ते वारा - वारे
      सदरा - सदरे श्रोता - श्रोते मळा - मळे
      कांदा - कांदे कावळा - कावळे तारा - तारे
      तालुका - तालुके दरवाजा - दरवाजे दाणा - दाणे
      दागिना - दागिने दिवा - दिवे दोरा - दोरे
      पिसारा - पिसारे पेढा - पेढे फुगा - फुगे
      मुखडा - मुखडे मुखवटा - मुखवटे
      अपवादात्मक शब्द
      पण काही आकारांत शब्दाचे नामाचे अनेकवचन हे 'ए' कारान्त न होता, तसेच राहते.
      उदाहरणार्थ:- मामा, पूजा, सभा, विद्या, दिशा, अज्ञान, माता, दिशा.
    • नियम २: काही आकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन 'आ'कारांत होते तर काहीची 'इ'कारांत होते.
    • उदाहरणार्थ:-
      एकवचन - अनेकवचन एकवचन - अनेकवचन
      खारीक - खारका माळ - माळा
      गार - गारा रांग - रांगा
      चूक - चुका वाट - वाटा
      तार - तारा वीज - विजा
      तारीख - तारखा वीट - विटा
      नक्कल - नकला वेळ - वेळा
      हाक - हाका सून - सुना
      खाट - खाटा मान - माना
      चिंच - चिंचा बँक - बँका
      फौज - फौजा बाग - बागा
      मिरवणूक - मिरवणुका मौज - मौजा
      गरज - गरजा जखम - जखमा
      जाणीव - जाणिवा झुळूक - झुळका
      झोप - झोपा धार - धारा
      नजर - नजरा नोट - नोटा
      रक्कम - रकमा लाज - लाजा
      लाट - लाटा वाट - वाटा
      शपथ - शपथा हाक - हाका
    • नियम ३:-'अ'कारांत शब्दाचे रूपांतर 'ई' कारान्त करून एक वचनाचे अनेकवचन करता येते.
      'अ'कारान्त शब्दाचे वचन बदल करणे
      एकवचन-अनेकवचन

    • उदाहरणार्थ:-
      एकवचन - अनेकवचन एकवचन - अनेकवचन एकवचन - अनेकवचन
      अंघोळ - अंगोळी इमारत - इमारती ओळ - ओळी
      कमान - कमानी गंमत - गमती गाय - गायी
      गोष्ट - गोष्टी जमीन - जमिनी पेन्सिल - पेन्सिली
      बहीण - बहिणी भेट - भेटी मैत्रीण - मैत्रिणी
      रात्र - रात्री वाघीन - वाघिणी वेल - वेली
      सहल - सहली सायकल - सायकली सिंहीण - सिंहिणी
      विहीण – विहिणी विहीर – विहिरी भिंत – भिंती
      म्हेस - म्हशी पाल - पाली
    • नियम ४:-'आ'कारांत शिवाय इतर पुल्लिंगी नामाची रुपे दोन्ही वचनात सारखेच असतात.
    • उदाहरणार्थ:-
      एकवचन - अनेकवचन एकवचन - अनेकवचन एकवचन - अनेकवचन
      उंदीर - उंदीर माळी - माळी सिंह - सिंह
      कवी - कवी राक्षस - राक्षस साप - साप
      खडू - खडू लाडू - लाडू माता - माता
      गरुड - गरुड वाघ - वाघ तराजू - तराजू
      गहू - गहू विषय - विषय गती - गती
      गुरु - गुरु शत्रू - शत्रू जादू - जादू
      चिरंजीव - चिरंजीव हत्ती - हत्ती धनू - धनू
      डोंगर - डोंगर हार - हार दासी - दासी
      तेली - तेली देव - देव वस्तू - वस्तू
      दगड - दगड फोनो - फोनो युवती - युवती
      पक्षी - पक्षी भाषा - भाषा दृष्टी - दृष्टी

      आणखी खूप सार्‍या शब्दांचे एकवचन व अनेकवचन हे सारखेच असते. त्यांची काही उदाहरणे म्हणजे अभ्यास, आकार, आवाज, उत्सव, कथा, कल्पना, कंदील, कान, खेळ, गुलाब, चोर, चौकोन, ढग, दिवस, देश, नळ, पतंग, पदार्थ, पक्षी, पाट, पाठ, पाय, पेरू, पोपट, प्रश्न, प्राणी, फणस, बैल, भाऊ, मित्र, मोर, रंग, लाडू, वर्ग, विचार, विद्यार्थी, वृक्ष, वेश, शब्द, शाळा, शेजारी, शेतकरी, शोध, सण, हात, हौद इत्यादि.


    • नियम ५: खालील 'ए' कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन 'या' कारांत होते म्हणजे शब्दाला 'या' जोडून अनेकवचन बनविता येते.
    • उदाहरणार्थ:-
      एकवचन - अनेकवचन एकवचन - अनेकवचन
      उजळणी - उजळण्या पपई - पपया
      काठी - काठ्या फणी - फण्या
      गाडी - गाड्या बाई - बाया
      चांदणी - चांदण्या बाराखडी - बाराखड्या
      चिपळी - चिपळ्या बी - बिया
      जाळी - जाळ्या भाकरी - भाकऱ्या
      टाचणी - टाचण्या लोटी - लोट्या
      नदी - नद्या लेखणी - लेखण्या
      नळी - नळ्या स्त्री - स्त्रिया
      पणती - पणत्या चटई - चटया
      कळी - कळ्या काडी - काड्या
      कुंडी - कुंड्या कैरी - कैर्‍या
      खोली - खोल्या गोळी - गोळ्या
      घडी - घड्या चिमणी - चिमण्या
      छत्री - छ्त्र्या जोडी - जोड्या
      टाकी - टाक्या टेकडी - टेकड्या
      टोळी - टोळ्या दोरी - दोर्‍या
      पाटी - पाट्या पोळी - पोळ्या
      बशी - बश्या बाटली - बाटल्या
      भाजी - भाज्या बादली - बादल्या
      मेणबत्ती - मेणबत्या मोळी - मोळ्या
      वहिनी - वहिन्या वही - वह्या
      वाटी - वाट्या सावली - सावल्या
      सुट्टी - सुट्ट्या हजेरी - हजेर्‍या
      होळी - होळया वाहिनी - वाहिन्या
      अंगठी - अंगठ्या उडी - उड्या
      कहाणी - कहाण्या कोंबडी - कोंबड्या
      कात्री - कात्र्या खुर्ची - खुर्च्या
      घोडी - घोड्या चौकशी - चौकश्या
      झोळी - झोळया मोळी - मोळ्या
      टाळी - टाळ्या थैली - थैल्या
      पिशवी - पिशव्या फळी - फळ्या
      फांदी - फांद्या बकरी - बकर्‍या
      बांगडी - बांगड्या बातमी - बातम्या
      मासोळी - मासोळया शिडी - शिड्या
      सही - सह्या
    • नियम ६:खालील 'अ' कारांत शब्द नामाचे अनेकवचन 'ए' कारान्त होतो.
    • उदाहरणार्थ:-
      एकवचन - अनेकवचन एकवचन - अनेकवचन एकवचन - अनेकवचन
      अंगण - अंगणे नक्षत्र - नक्षत्रे मस्तक - मस्तके
      अरण्य - अरण्ये पंचांग - पंचांगे रत्न - रत्ने
      कुटूंब - कुटुंबे पत्र - पत्रे रान - राने
      गाव - गावे पाऊल - पाऊले लाकूड - लाकडे
      घर - घरे पीक - पिके शरीर - शरीरे
      जंगल - जंगले पुस्तक - पुस्तके शेत - शेते
      डाळिंब - डाळिंबे फळ - फळे श्वापत - श्वापदे
      तोरण - तोरणे फूल - फुले स्वप्न - स्वप्ने
      दप्तर - दप्तरे बक्षीस - बक्षिसे तोंड - तोंडे
      दार - दारे बीळ - बिळे घड्याळ - घड्याळे
      दृश्य - दृश्ये भाषण - भाषणे अक्षर - अक्षरे
      आश्चर्य - आश्चर्ये औषध - औषधे अंग - अंगे
      उत्तर - उत्तरे काम - कामे खत - खते
      गुपित - गुपिते चित्र - चित्रे जीवन - जीवने
      जेवण - जेवणे झाड - झाडे धान्य - धान्ये
      नाव - नावे पान - पाने पोट - पोटे
      फूल - फुले मन - मने माणूस - माणसे
      मूल - मुले युग - युगे रोप - रोपे
      वर्ष - वर्षे शिंग - शिंगे स्वप्न - स्वप्ने

मराठी वाक्प्रचार व त्याचा अर्थ        वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 
लिंग (स्त्रीलिंग, पुल्लिंग व नपुसकलिंग) वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

    • नियम ७: खालील 'ए' कारांत शब्द नामाचे अनेकवचन 'ई' कारान्त होतो.
    • उदाहरणार्थ:-
      एकवचन - अनेकवचन एकवचन - अनेकवचन
      केळे - केळी गाणे - गाणी
      रताळे - रताळी खेडे - खेडी
      तळे - तळी खेळणे - खेळणी
      लाटणे - लाटणी धुडके - धुडकी
      मटके - मडकी पातेले - पातिली
    • नियम ८: 'ऊ' कारान्त शब्दाचे अनेकवचन हे 'ए' कारान्त होतो.
    • उदाहरणार्थ:-
      लिंबू - लिंबे
      तट्टू - तट्टे
      वासरू - वासरे
      पाखरू - पाखरे
      पिलू - पिले
    • इतर शब्द
    • मोती - मोते/मोत्ये
      मिरी - मिरे/मिर्‍ये
  1. हे लक्षात असू द्या.
  2. थोर माणसांचा किंवा वडीलधार्‍या माणसांचा उल्लेख करताना नेहमी अनेकवचन वापरले जाते. त्यास आदरार्थी बहुवचन म्हणतात.
    उदाहरणार्थ:- ते गांधीजी, ते वडील, ते ऋषी, ते आजोबा.

    सराव प्रश्न संच

    पुढील शब्दांपुढे एक की अनेक ते लिहा.(state the number of:)
    1. फुगा - _______
    2. अंगण - _______
    3. भाज्या - _______
    4. दागिने - _______
    5. ओळी - _______
    6. डबा - _______
    7. गाणे - _______
    8. इमारती - _______
    9. कांदे - _______
    10. पोळी - _______
    पुढील शब्दांचे अनेकवचन लिहा.(Write the plural form:)
    1. मेणबत्ती - _______
    2. नदी - _______
    3. तळे - _______
    4. माणूस - _______
    5. सायकल - _______
    6. फळ - _______
    7. झोका - _______
    8. बहीण - _______
    9. पाखरू - _______
    10. पेढा - _______
    पुढील शब्दांचे एकवचन लिहा.(Write the singular form:)
    1. नाणी - _______
    2. गोठे - _______
    3. मने - _______
    4. स्त्रिया - _______
    5. मुलगे - _______
    6. वर्षे - _______
    7. राजे - _______
    8. घोडे - _______
    9. बागा - _______
    10. पाने - _______
    पुढील शब्दांचे वचन बदला.(change the number form:)
    1. रंग - _______
    2. भाषा - _______
    3. मित्र - _______
    4. पक्षी - _______
    5. मोर - _______
    6. शाळा - _______
    7. गाणे - _______
    8. भाऊ - _______
    9. प्रश्न - _______
    10. धार - _______

    अशा प्रकारे वचन म्हणजे वस्तू एक आहे का अनेक त्याची संख्या होय. वचनाचे एकवचन व अनेकवचन असे प्रकार आहेत. एकवचनाचे अनेकवाचंनमध्ये तर अनेकवचनाचे एकवचनामध्ये रूपांतर करता येते.

Share on Google Plus

About Vikas Dev

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment

2 Comments:

Anjali म्हणाले...

छान. मस्त माहिती आहे. स्पर्धा परीक्षेकरीता उपयुक्त

अनामित म्हणाले...

Patang