शब्दसिद्धी : तत्सम, तद्भव, देसी व परदेशी शब्द

शब्दसिद्धी

    शब्दांची उत्पत्ती कशी झाली आहे म्हणजेच शब्द कसे बनतात म्हणजेच सिद्ध होतात यालाच ‘शब्दसिद्धी’ असे म्हणतात. मराठीतील शब्द कुठून आले, कधी आले याचे संशोधन म्हणजे शब्दाची व्युत्पत्ती होय आणि एखाद्या शब्दापासून किंवा धातूपासून शब्द तयार करणे म्हणजे ‘शब्दसिद्धी’ होय. मराठी भाषेत जसे मूळ शब्द आहेत तसेच इतर भाषेतून आलेले अनेक शब्द आहेत. संस्कृत ही सर्व भारतीय भाषांची जननी आहे. आपली मराठी भाषा ही देखिल मुख्यत: संस्कृत प्राकृत या भाषापासून निर्माण झालेली आहे. त्यामुळेच संस्कृत व प्राकृत भाषेतील शब्दांचा भरणा मराठीत अधिक आहे.शब्दसिद्धीमध्ये तत्सम, तद्भव, परदेशी व देशी  चार प्रकारचे शब्द मोडतात,

तत्सम शब्द, तद्भव शब्द, देसी शब्द, परभाषीय शब्द व त्यांची व्याख्या आणि उदाहरणे
शब्दसिद्धी


  • तत्सम शब्द:-

  •     संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीत आलेल्या म्हणजेच त्यांच्या मूळ रूपात कोणताही बदल न झालेल्या शब्दांना तत्सम शब्द म्हणतात. हे शब्द संस्कृत मधून कसलाही बदल न करता जसेच्या तसे घेतले गेलेले असतात. काही शब्द संस्कृतध्ये ह्र्स्व तर मराठीत दीर्घ लिहीतात. तरी उच्चारत समानता असल्याने ते तत्समच मानतात.तत्सम शब्दाची उदाहरणे अशी आहेत.

        उदाहरणे: अंध, अब्ज, अभिषेक, अरण्य, अश्रू, आकाश, आल्हाद, उत्तम, उत्सव, उपकार, उमेश, ऋण, कन्या, कर, कलश, कवि, कविता, कस्तुरी, कार्य, कृष्ण, कौमुदी, क्लेश, क्षिती, गंध, गणित, गणेश, गायन, गीता, गुरु, गौरी, ग्रंथ, घंटा, घृणा, चंचू, चतुर्थी, जगन्नाथ, जल, तट्टिका, तथापि, तम, तर्क, तस्मात, तारा, तिथी, तृप्ती, दंड, दर्शन, दही, दुष्ट, दुष्परिणाम, देवर्षि, देवालय, धर्म, धेनू, नयन, निर्माल्य, निर्मिती, निश्चय, निस्तेज, नृप, नेत्र, नैवेद्य, पति, पत्नी, पत्र, परंतु, पर्ण, पाप, पिंड, पिता, पुण्य, पुत्र, पुरुष, पुष्प, पृथ्वी, प्रकाश, प्रतिष्ठा, प्रसाद, प्राणी, प्रात:काल, प्रीती, प्रीत्पर्य, बिंदू, बुद्धि, भगवान, भगिणी, भिक्षू, भीति, भूगोल, भोजन, मंत्र, मंदिर, मधु, मस्तिष्क, महर्षि, यथामति, यद्यपि, राजा, राज्य, राहु, लघु, लीला, वसुधा, वाणी, विचार, विद्वान, विभूती, विश्राम, विष, वृक्ष, वृद्ध, वेणु, शिखर, श्राद्ध, संगती, संत, संधि, संसार, सत्कार, सत्य, सन्मति, सभ्य, समर्थन, सुचि, सुवर्ण, सूत्र, सूर्य, सृष्टी, सेना, स्वल्प, स्वामि, होम इत्यादी.

        काही शब्द संस्कृतमध्ये हस्व तर मराठीत दीर्घ लिहीतात. तरी उच्चारात समानता असल्याने ते तत्समच मानतात. जसे: कवि - कवी, पति-पती, स्वामि- स्वामी



  • तद्भव शब्द:-

  •     संस्कृतमधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या रूपात बदल झाला आहे, त्यांना तद्भव शब्द म्हणतात. संस्कृत मधिल काही शब्द मराठी भाषेत वापरतांंना त्यात कालानुरूप काही बदल झाले व नंतर ते समाजात प्रचलित झाले.हेच संस्कृतमधून बदल होऊन आलेले शब्द म्हणजे तद्भव शब्द होय.खालील तक्त्यात पहिले तत्सम शब्द व त्यानंतर तत्सम पासून बनलेला तद्भव शब्द दिलेला आहे. 

    तत्सम शब्द तद्भव शब्द तत्सम शब्द तद्भव शब्द
    भगिणी बहिन पंक पंख
    अंजुली औंजळ पय पाणी
    अंध आंधळा पर्ण पान
    अग्नि आग पश्चाताप पस्तावा
    अज्ञानी अडाणी पद पाय
    अश्रू आसू पुत्र पुत
    उद्यम उद्योग पुष्प फूल
    कंटक काटा पृष्ठ पाठ
    कर्ण कान पेटिका पेटी
    कर्पास कापूस भ्राता भाऊ
    कर्म काम मक्षिका माशी
    कलश कळस मर्कट माकड
    काष्ठ काठी मस्तक माथा
    कुठार कुऱ्हाड मार्जर मांजर
    कोमल कोवळा मुष्ठी मुठ
    क्षेत्र शेत मूल मूळ
    गुड गुळ मृदू मऊ
    गृह घर राज्ञी राणी
    ग्राय गाय विनति विनंती
    ग्रास घास विश्राम विश्रांती
    घर्म घाम वृद्धी वाढ
    चंचू चोच वृश्चिक विंचू
    चक्र चाक व्याघ्र वाघ
    चौर्य चोरी व्रण वण
    तक्र ताक शर्करा साखर
    तृण तण शाला शाळा
    तृष्णा तहान शीर्ष शिर
    तैल तेल श्वसुर सासरा
    दीप दिवा सर्प साप
    दुग्ध दूध स्मशान मसण
    देवालय देऊळ स्वसृ सासू
    धूम्र धूर हस्त हात
    नील निळा दंत दात
    वाणी वाण वंध्या वांझ
    भाल भाळ धवल ढवळा


  • देशी शब्द:-

  •     जे शब्द मूळ महाराष्ट्रातील रहिवाशांच्या बोलीभाषेतील मानले जातात, त्यांना देशी शब्द म्हणतात. मराठीत असे काही शब्द आहेत जे तत्सम नाहीत, तद्भव नाहीत आणि परदेशी शब्द ही नाहीत. तर ते महाराष्ट्रात पूर्वी जे रहिवाशी होते त्यांच्या बोलीभाषेतील ते असवेत. अशा शब्दाना ‘देश्य, देशी, किंवा देशज’ असे म्हणतात. देशी शब्दांची सरल व्युत्पत्ती सांगता येत नाही. म्हणजेच ते कसे तयार झाले हे सांगणे कठीण असते.
        उदाहरण: अवकळा, आजार, उजेड, उडी, उतरंड, उनाडकी, ओटा, ओटी, ओढा, ओरडणे, ओसरी, कंबर, कचरा, खवाटा, खुळा, खेटर, गार, गुडघा, घोडा, घोसाळे, चिखल, चिमणी, चोर, जोंधळा, झांजर, झाड, झोप, डहाळी, डिंक, डुडुळ(घुबड), डोंगर, डोळा, ढेकूण, दगड, धड, धपाधप, धोंडा, पाऊस, पीठ, पेंढी, पोट, पोटरी, पोपट, पोरकट, पोळीफटकळ, बाजरी, बाप, बारी, बोका, मळकट, मोठा, राघू, रेडा, रोग, लाकूड, लाजरा, लुगडे, लोटी, वांगे, वारकरी, वेढा, शेतकरी, सांडवा, सावळा, हत्यार, हाड इत्यादी.

  • परभाषीय शब्द:-

  •     संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषामधून मराठीत शब्द आलेले आढळतात.मराठी भाषेमध्ये कानडी, गुजराथी, इंग्रजी, हिंदी, पोर्तुगीज, फारसी,अरबी,तेलगू, तमिळ इत्यादी भाषेतून शब्द आलेले आहेत. येथे इतर भाषांमधून मराठी मध्ये आलेले शब्द येथे दिलेले आहेत.
  1. कानडी भाषेतील शब्द:-

  2.     उदाहरण: अक्का, अच्छेर, अडका, अडकित्ता, अण्णा, अप्पा, आई, आमसूल, आवळा, उडीद,उत्तपा, उपीट, उसळ, कडबोळी, कणिक, कणिक, काका, कांबळे, किल्ली, कुंची, कोलदांडा, कोशिंबीर, खलबत्ता, खिडकी, खिसा, खोबरे, गच्ची, गडंगनेर, गड्डा, गाजर, गाडगे, गादी, गाल, गुंडा, गुंडी, गुढी, गोंधळ, चप्पल, चंबू, चाकरी, चिंच, चिंधी, चिमटा, चिरगुट, झुरळ, टाळू, डोसा, तंदूर, तांब्या, ताई, तुंबा, तूप, दाभण, दोडकी, दिल्ली, नथ, पगडी, पडवळ, परडी, पाट, पेटी, बगल, बांगडी, बांबू, बोट, बोणे, मिरवणुक, भंगार, भाकरी, भांडे, मुंडाळे, यळकोट, राजाई, लवंग, विठोबा, विळी, शिंपी, शिकेकाई, हंडी इत्यादी.


  3. गुजराथी भाषेतील शब्द:-

  4.     उदाहरण: दादर, घी, शेट, डबा, दलाल, छोकरा, थाली, शेट, छोकरी, बेसण, रिकामटेकडा, मोटा, बरकत, धमणी, पिशाच, आवकजावक, मथळा, दामदूपट, ढोकळा इत्यादी.


  5. पोर्तुगीज भाषेतील शब्द:-
  6.     उदाहरण: अलमारी, काडतूस, कोबी, गोष्टी, घमेले, चावी, टिकाव, तंबाखू, तिजोरी, तुरुंग, पगार, परात, पादरी, पायरी, पाटलूण, पाव, पुरावा, पिंप, पेरू, फणस, बटाटा, बिजागरी, बिस्कूट, मिस्त्री, मेस, लवाद, लिंबू, लोणचे, संत्रा, साबण, साबुदाणा, हापुस इत्यादी. 


  7. हिंदी भाषेतील शब्द:-
  8.     हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. भारतात हिंदी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो.मराठी माणूसही मोठ्या प्रमाणात दैनंदिन जीवनात हिंदी भाषेचा वापर करीत असतो.

        उदाहरण:दिल, दिमाग,बच्चा, तपास, भाई, और, बात, कच्चा, दाम, करोड, समाचार, देर, डाक, अव्वल, किसान, रिश्ता, समारोह, चाचा, बुखार, थैली, इत्यादी. 


  9. इंग्रजी भाषेतील शब्द:-
  10.     भारतावर 150 वर्ष इंग्रजांचे राज्य होते त्यामुळे भारतीय लोकांवर इंग्र्जी भाषेचा फार परिनाम झालेला आढळतो. तसेच इंग्र्जी ही आंतराष्ट्रीय भाषा असल्याने भारतीय लोकांचा ओढा या भाषेकडे अधिक आहे.त्यामुळे मराठी भाषेत अधिकाधिक इंग्रजी भाषेचा वापर होतांना दिसतो.

        उदाहरण:पार्सल, मास्तर, टेबल, स्टेशन, फी, फाईल, तिकिट, नर्स, बोर्ड, टेनिस, सिनेमा, सर्कस, ऑफिस, कॉलेज, डॉक्टर, रेडिओ,एजंट इत्यादी. 


  11. फारसी भाषेतील शब्द :-  
  12.     उदाहरण: अक्कल, अत्तर, अनार, अब्रू, इंसाफ, उमेदवार, कागज, कामगार, कारखाना, किसान, किताब, कुस्ती, खलाशी, खाना, खुराक, खुमारी, खून, गझल, गालीच्या, गुन्हेगार, गुलाब, जबरी, जमादार, जमीन, जंग, झुलून, डावपेच, तराजू, दरबार, दस्तूर, दवाखाना, दिवाणखाना, दिरंगाई, दौलत, नजराना, नोकरी, नौकर, पालखी, पेशवा, पैलवान, पोशाख, फडणवीस, फिर्यादी, फैसला,बंदूक, बक्षीस, बगीचा, बागायत, बाजार, बारदाना, मस्करी, मस्ती, महिना, मादी, मिठाई, मेवा, रवानगी, शहनाई, शर्मिंदा, शिलेदार, सतरंजी, सरदार, सामान, सिलसिला, सुमार, सौदागर, हकीकत, हवालदार, हुशारी इत्यादी. 


  13. अरबी भाषेतील शब्द:-
  14.     उदाहरण: अर्ज, आमदनी, इनाम इमान इमारत मेहनत हुकूम खर्च मंजूर जाहीर उर्फ मनोरा बाद मुदत बदल बंदी हंगाम फलाणा, मालक साहेब शाहीर पुतळी सुलतान तमाशा मकान अक्कलकंदिल कणा कफन ताकत रयत, गमजा, नक्शा, कुर्रा, खजिल, तलाक, बातमी, जामीन, तारीफ, तालूका, तगाई इत्यादी.


  15. तामिळ शब्द:-
  16.     उदाहरण: सार,मठ्ठा, भेंडी, मांजरपाट, टेंगूळ, डबी, चिल्लीपिल्ली इत्यादी.


  17. तेलगू शब्द:-
  18.     उदाहरण: अनारसा, टाळा, गदारोळ, विटी दांडू, जाडी, कांबळे, डबी, गदारोळ, चेंडू इत्यादी.


  19. कोकणी भाषेतील शब्द:-
  20.     गजाळी


  21. फ्रेंच भाषेतील शब्द:-
  22.     काडतूस


        अशाप्रकारे मराठी भाषेमध्ये संस्कृत, कानडी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, फारसी, पोर्तुगीज,अरबी, तेलगू, तमिळ इत्यादी भाषेतून शब्द आलेले आहेत.सर्व शब्द मराठी जनमानसात इतके मिसळून गेले आहेत की ते शब्द परदेशी आहेत हेच लक्षात येत नाही. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीकोनातून याचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.

Share on Google Plus

About Vikas Dev

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.