दादोबा पांडुरंग तर्खडकर

             मराठी भाषेचे व्याकरणकार, मराठी भाषेचे गाढे अभ्यासक, मराठी व्याकरणाचे पाणिणी, विविध विषयावर लेखन करणारे लेखक तसेच मानवधर्मसभा (१८४४ ), परमहंस सभा (१८४९), प्रार्थना समाज(१८६७), ज्ञान प्रसारक सभा (१८४८) अशा विविध सामाजिक संस्थेचे संपादक सदस्य व या संस्थेमार्फत सामाजिक सुधारणेसाठी प्रयत्न करणारे समाजसुधारक म्हणजेच दादोबा पांडुरंग तर्खडकर (Dadoba Pandurang Tarkhadakar).

dadoba pandurang tarkhadkar information' दादोबा पांडुरंग तर्खडकर

 जन्म व जीवन:-

            दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म ९  मे १८१४ मुंबई (खेतवाडी) येथे झाला.  त्यांचे घराणे तरखड या गावातील (जिल्हा ठाणे तालुका वसई) होते म्हणून त्यांचे आडनाव तर्खडकर पडले . तेथून त्यांचे आजोबा मुंबई येथे कामानिमित्त आले व मुंबईत स्थायिक झाले. दादोबा यांना ३ भाऊ होते. तसेच त्यांचे बंधू भास्कर तर्खडकर व आत्माराम तर्खडकर आपापल्या क्षेत्रात नावाजलेले व्यक्तिमत्व होते तसेच  समाजसुधारणेत त्यांचा सक्रिय सहभाग  होता.


             दादोबा तर्खडकर यांचे प्राथमिक शिक्षण पंतोजीच्या शाळेत झाले. प्राथमिक शिक्षण सुरू असताना त्यांनी फारसी व संस्कृत भाषा अवगत केल्या. १८२५ मध्ये पुढील शिक्षणाकरिता मुंबई मधील शाळेत तसेच शाळा पुस्तक मंडळाच्या बॉम्बे नेटिव्ह स्कूल अँड स्कूल बुक सोसायटीच्या शाळेत प्रवेश घेतला. पुढे या शाळेचे नाव एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट करण्यात आले. १८३५ मध्ये एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट या शाळेत सहाय्यक शिक्षक (असिस्टंट टीचर) म्हणून कार्यरत झाले. काही काळ त्यांनी जावरा संस्थानच्या नवाबचे शिक्षक म्हणूनही कार्य केले. १८४४ साली सुरत येथे दिनमणिशंकर, दलपतराय, दुर्गाराम मंछाराम (मनसाराम) यांच्या सहकार्याने मानव धर्म सभा स्थापन केली.

            १८५२ साली दादोबा अहमदनगर येथे डेप्युटी कलेक्टर या पदावर नियुक्त होते. १८५७ च्या बंडच्या वेळेस दादोबा यांनी इंग्रजांना सहाय्य केले. त्यांनी भिल्लांच्या बंडचा बंदोबस्त केला. म्हणून इंग्रज सरकारनी त्यांना ‘रावबहादूर’ ही पदवी बहाल केली. ‘रावबहादूर' ही पदवी मिळविणारे ते एकमेव समाजसुधारक होय. 

मराठी व्याकरणाचे पाणिनी दादोबा तर्खडकर :-

            मराठीचे व्याकरण लिहावे अशी त्यांची इच्छा होती. १८३३ साली दादोबा  यांनी प्रश्न उत्तर स्वरूपातील मराठीच्या  व्याकरणावरील एक पुस्तक लिहिले पण ते त्यांना स्वतःलाच आवडले नाही . म्हणून इंग्लिश व्याकरणकार लिंडली मर्फी  यांच्या इंग्लिश व्याकरणाचा अभ्यास करून त्याच्या धर्तीवर मराठी व्याकरण पुस्तिका त्यांनी तयार केली.  हे पुस्तक त्यांनी गणपत कृष्णाजीच्या छापखान्यात छापले. हे पुस्तक त्यांनी स्वतः ‘महाराष्ट्र भाषेचे व्याकरण’ या नावाने प्रकाशित केले.  या पुस्तकाची पहिली आवृत्ती १८३६ रोजी प्रकाशित झाली.

            शिक्षण विभागाकरिता १८५० रोजी त्यांनी ‘महाराष्ट्र भाषेचे व्याकरण’ या पुस्तकाची दुसरी आवृत्ती तयार केली.  या आवृत्तीचे मेजर थॉमस कॅन्डी, कृष्णशास्त्री चिपळूणकर यांच्या सारख्या विद्वानांकडून परीक्षण करण्यात आले. १८६५ साली  त्यांनी आपल्याला व्याकरण पुस्तिकेची लघू आवृत्ती ‘मराठी लघू व्याकरण’ या नावाने प्रकाशित केली.  १८८२  पर्यंत ‘मराठी लघू व्याकरण’ या पुस्तकाच्या १२ आवृत्त्या प्रकाशित झाल्या. ‘महाराष्ट्र भाषेचे व्याकरण’ या पुस्तकाच्या सात आवृत्या छापून प्रकाशित करण्यात आल्या तसेच मोठ्या 'महाराष्ट्र व्याकरणाची पूरणिका' हा ग्रंथ सुद्धा त्यांनी लिहिला.दादोबा यांनी मराठी व्याकरण विषयक मोलाचे कार्य केले. त्यामुळे मराठी गद्याला प्रमानरुप प्राप्त झाले. त्यांचे मराठी भाषेतील व्याकरणासाठी असलेले योगदान लक्षात घेतात त्यांना ‘मराठी व्याकरणाचे पाणिनी’ संबोधण्यात येते.

           दादोबा तर्खडकर यांचे १८४६ सालापर्यंतचे आत्मचरित्र त्यांनी लिहिले. हे आत्मचरित्र मराठीतील महत्त्वाचे आत्मचरित्र मानल्या जाते. हे आत्मचरित्र इंग्रजीत आहे. ब्रिटिश काळातील अव्वल इंग्रजीतील एकमेव आत्मचरित्र म्हणून या आत्मचरित्राला पहिल्या जाते. ब्रिटिश काळातील सद्यस्थितीतील सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि शैक्षणिक स्थितीचे प्रतिबिंब या आत्मचरित्रात पाहायला मिळते. त्या काळातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व धार्मिक अभ्यासाकरिता हे एक मोलाचे साहित्य आहे. सोपे सोज्वळ निवेदन व साधी भाषाशैली ही ह्या आत्मचरित्राची महत्त्वाची वैशिष्ट्ये होय. त्यांचे आत्मचरित्र ‘दादोबा पांडुरंग यांचे आत्मवृत’ या नावाने मराठीत रूपांतरित
झाले. १९४७ साली अ. का. प्रियोळकर यांनी दादोबा यांचे आत्मचरित्र संपादित करून पुनःप्रकाशित केले.

लेखन कार्य :- 

            दादोबा यांनी समाजकार्य बरोबरच लेखनकार्य ही केले. विविध विषयावर त्यांनी लेखन केलेले आढळते. तसेच त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे त्यांनी स्वतः प्रकाशन सुद्धा केले. त्याचे काही पुस्तके व लेखन कार्य खालील प्रमाणे होय.

        १) मराठी भाषेचे व्याकरण

        अ) पहिली आवृत्ती -१८३६

        आ) दुसरी आवृत्ती – १८५०

        इ) तिसरी आवृत्ती – १८५७

       २) मराठी नकाशाचे पुस्तक (नकाशा संग्रह) – १८३६

       ३) दादोबा पांडुरंग यांचे आत्मवृत (आत्मचरित्र) – १८४६

       ४) तर्खडकर भाषांतर पाठमाला-भाग १ ते ३ (शैक्षणिक)

       ५) इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका (वैचारिक) – १८६०

       ६) धर्मविवेचन (वैचारिक) – १८६७

       ७) मराठी लघु व्याकरण ( व्याकरण) – १८६५

       ८) अ हिंदू जंटलमन्स रिफ्लेक्शन्स रिस्पेक्टिंग द वर्क्स ऑफ एमॅन्युएल स्वीडनबर्ग (वैचारिक इंग्रजी) – १८७८

       ९) मोठ्या महाराष्ट्र व्याकरणाची पूरणिका (व्याकरण) – १८८१

      १०) शिशू बोध (वैचारिक)–१८८४

Share on Google Plus

About Vikas Dev

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.