लिंग म्हणजे काय?
लिंग याचा अर्थ खूण किंवा चिन्ह होय. लिंग या शब्दमधून आपण वस्तूचे किंवा सजीवांचे पौरुषत्व स्त्रीत्व अथवा दोन्ही नसलेले नपुसकत्व शोधतो. प्राणिमात्राचे, सजीवांचे लिंग हे वास्तविक असते. तर निर्जीव वस्तूंचे लिंग हे काल्पनिक असते कारण ते वस्तूचा आकार, गुणधर्म, वैशिष्ट्य यावरून ठरते. “ज्या नामावरून किंवा शब्दावरून पुरुष/नर जातीचा किंवा स्त्री/मादी जातीचा बोध होतो, त्यास लिंग असे म्हणतात.” मराठी भाषेमध्ये लिंगाचे 3 प्रकार आहेत.- पुल्लिंग (Masculine Gender)
- स्त्रीलिंग (Feminine Gender)
- नपुंसक लिंग (Neutral Gender)
पुल्लिंग:-
ज्या नामावरून किंवा शब्दातून पुरुष अथवा नर जातीचा बोध होतो, त्यास पुल्लिंग असे म्हणतात. मोठा आकार, शक्ती, राकटपणा, जोर, कठोरपणा, भव्यता, दांडगाई, पराक्रम असे पुरुषप्राण्याचे सर्वसामान्य गुणधर्म, वैशिष्ट्य ज्या वस्तूमध्ये आढळतात, त्याचे लिंग हे पुल्लिंग (Masculine Gender) समजण्यात येते.स्त्रीलिंग:-
ज्या नामावरून किंवा शब्दातून स्त्री अथवा मादी जातीचा बोध होतो, त्यास स्त्रीलिंग (Feminine Gender) असे म्हणतात.नपुंसक लिंग:-
ज्या नामावरून किंवा शब्दातून स्त्री अथवा पुरुष या दोन्ही जातीचा बोध होत नाही, त्यास नपुंसक लिंग (Neutral Gender) असे म्हणतात.हे वाचण्यासाठी क्लिक करा. मराठी वाक्प्रचार व त्याचा अर्थ
पुल्लिंग, स्त्रीलिंग व नपुंसक लिंग कसे ओळखावे?
मराठी भाषेत शब्दाच्या पुढे ‘तो’, ‘ती’ किंवा ‘ते’ लावून त्या शब्दाचे, नामाचे लिंग ओळखता येते. शब्दापुढे अथवा नामपुठे ‘तो’ येत असेल तर त्या नामाचे/शब्दाचे लिंग पुल्लिंग समजावे. जर शब्दापुढे ‘ती’ येत असेल तर लिंग स्त्रीलिंग समजावे आणि जर शब्दापुढे ‘ते’ येत असेल तर त्याचे लिंग नपुंसक लिंग समजावे. आपण हे खालील तकत्यावरून समजावून घेवू.तो-मुलगा ती-मुलगी ते-मूल
तो-कुत्रा ती-कुत्री ते-पिल्लू
तो-घोडा ती-घोडी ते-शिंगरु
तो-बैल ती-गाय ते-वासरू
तो-मेंढा ती-मेंढी ते-मेंढरू
तो-चिमणा ती-चिमणी ते-पाखरू
तो-रेडा ती-रेडी/म्हैस ते-रेडकू
तो-आंबा ती-कैरी ते-केळ
तो-सूर्य ती-मेणबती ते-तेज
तो-प्रकाश ती-सावली ते-ऊन
तो-डोंगर ती-दरी ते-टेकाड
तो-फळा ती-शाळा ते-पुस्तक
तो-समुद्र ती-नदी ते-पाणी
तो-अंगठा ती-करंगळी ते-बोट
तो-वृक्ष ती-फांदी ते-झाड
तो- बगीचा ती-बाग ते-उद्यान
तो-भात ती-पोळी ते-वरण
तो-चंद्र ती-चांदणी ते-चांदणे
तो-देश ती-मातृभूमी ते-राष्ट्र
तो-सदरा ती-साडी ते-पागोटे
तो-ग्रंथ ती-पोथी ते-पुस्तक
तो-देह ती-काया/तनू ते-शरीर
तो-देव ती-देवी ते-दैव
वरील उदाहरणांवरून असे लक्षात येते की मुलगा, घोडा, कुत्रा, बैल, मेंढा, चिमणी, रेडा, आंबा, सूर्य, प्रकाश, डोंगर, फळा, समुद्र, अंगठा, वृक्ष, बगीचा, भात, चंद्र, देश, सदरा, ग्रंथ, देह, देव या नामांपुढे आपण तो वापरतो म्हणून हे पुल्लिंगी शब्द किंवा नाम आहेत.
तर मुलगी, घोडी, कुत्रा, गाय, मेंढी, चिमणी, रेडी, कैरी, मेणबत्ती, सावली, दरी, शाळा, नदी, करंगळी, फांदी, बाग, पोळी, चांदणी, मातृभूमी, साडी, पोथी, काया, देवी यांच्या पुढे ‘ती’ वापरावे लागते म्हणजे हे स्त्रीलिंगी शब्द किंवा नाम आहेत.
तसेच मूल, पिल्लू, वासरू, मेंढर, पाखरू, रेडकू, केळ, तेज, ऊन, टेकाड, पुस्तक, पाणी, बोट, झाड, उद्यान, वरण, चांदणे, राष्ट्र, पागोटे, शरीर, दैव यांच्या पुढे ‘ते’ वापरावे लागते म्हणजे हे नपुसकलिंगी शब्द किंवा नाम आहेत.
पुल्लिंग, स्त्रीलिंग व नपुंसकलिंग वरील अधिक उदाहरणे,
पुल्लिंग:- थेंब, क्लास, नाच, बूट, वर्ग, अश्रू, आवाज, मित्र, डोह, देश, तकक्या, लोड, चेडू, पंखा, टेबल, निसर्ग, पिंप, वारा, बंब, भात, टाक, दिवा, कागद, दगड, पाला, लठ्ठपणा, पोवाडा, बोकड, मोर, उंदीर्म पेटा, माळी इत्यादि.
स्त्रीलिंग:- चादर, उशी, खुर्ची, नदी, पणती, रांगोळी, वही, लेखन, नक्षी, भाकरी, चपाती, मेहंदी, इमारत, बाहुली, दौत, शाई, वनश्री, वीज, लावणी, काया, पेन्सिल, कंपनी, मंडळी, पेटी, झुळूक, पालवी, आमराई, वीट, नथ, बिंदी, पैंजण, वास्तू इत्यादि.
नपुंसकलिंग:- स्वप्न, नृत्य, पुस्तक, सरपण, रूप, खड्ग, सौन्दर्य, वरण, घर, रान, तेज, शरीर, खेळणं, दफ्तर, विमान, माप इत्यादि. ( भाववाचक नामाचा बहुतांश वेळा नपुसकलिंगी वापर होतो. जसे – ते नावीन्य, ते वार्धक्य, ते शौर्य. )
लिंगबदल:-
नामाचे अथवा शब्दाचे लिंग बदलणे ( पुल्लिंगचे स्त्रीलिंग किंवा नपुंसक लिंग करणे अथवा स्त्रीलिंगचे रूपांतर पुल्लिंग किंवा नपुंसक लिंगात करणे ) म्हणजे लिंगबदल.
सामायिक शब्दाचे लिंग हे शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे असते.
जसे:- साखरभात (पुल्लिंग)- साखरभात या शब्दातील शेवटचा शब्द भात हा आहे भात पुल्लिंगी शब्द असल्या कारणाने साखरभात हा पुल्लिंगी शब्द आहे.
1. मीठभाकर (स्त्रीलिंगी)
2. गायरान (नपुसकलिंग)
3. भाजीपाला (पुल्लिंग)
4. भाऊबहीण (स्त्रीलिंगी)
5. देवघर (नपुसकलिंग)
पुढील पोस्ट वाचनासाठी क्लिक करा - अनेकार्थी शब्द
3 Comments:
🖐️
Hii🖐️
Hi who is this
टिप्पणी पोस्ट करा