ब्राह्मो समाज ( Brahmo Samaj) :-
1) राजा राम मोहन रॉय (Raja Rammohan Roy)यांनी कलकत्ता येथे 20 ऑगस्ट 1828 रोजी ब्राह्मो समाजाची स्थापना केली.
2) राजा राम मोहन रॉय यांना या कार्यात महाराजा द्वारकानाथ टागोर, काली नाथ रॉय आणि मथुरानाथ मलिक यांचे सहकारी मिळाले.
4) 27 सप्टेंबर 1833 रोजी राजा राम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर देवेंद्रनाथ टागोर यांच्याकडे नेतृत्व आले.
5) त्यांनी तत्वबोधिनी पाठशाळा स्थापन करून धर्माचे प्रचारक निर्माण करण्यावर भर दिला.
6) 1850 साली वेद आणि उपनिषदांना पूर्णपणे प्रमाणग्रंथ मानता येणार नाही ही विचारसरणी स्वीकारण्यात आली.
7) ब्राहमो धर्माचे प्रमाण आणि मुख्य आधार “अंतःप्रेरणा आणि निसर्ग अवलोकन” मानले गेले.
ब्राम्हो समाजाची सहा कलमे:-
1) ईश्वर कधीही अवतार घेत नाही.
2) ईश्वर हे व्यक्ती रुपाने अस्तित्वात असणारे सत्य असून त्याच्या ठिकाणी अत्युत्तम नैतिक गुण असतात.
3) सर्वांना ईश्वराच्या पूजेचा अधिकार असून सर्वांनी ईश्वराची मानसिक पूजाच करावी.
4) ईश्वर प्रार्थना एकूण प्रसन्न होतो.
5) ईश्वराचे ज्ञान अंतःप्रेरणा आणि निसर्ग यांच्या हातून होऊ शकते त्यामुळे कोणत्याही ग्रंथात धर्माचे शुद्ध आणि पूर्ण प्रमाण मानता येत नाही.
6) पश्चाताप आणि पाप निवृत्ती यांच्या योगाने ईश्वर क्षमा करून मोक्ष देतो.
भारतीय ब्राह्मो समाज:-
1) भारतीय ब्राह्मो समाज हा ब्राह्मो समाजाचा एक भाग होय. ब्राह्मो समाजातूनच भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना केशवचंद्र सेन यांनी केली.
2) केशवचन्द्र सेन 1857 साली ब्राह्मो समाजाच्या कार्यात सहभागी झाले. देवेंद्रनाथ टागोर यांनी आपले आचार्य पद केशवचंद्र सेन यांना बहाल केले.
3) केशवचन्द्र सेन यांनी महिलावर्गाला ब्राहमो समाजाच्या उपासना पद्धतीत प्रथमच प्रवेश दिला.
4) केशव चंद्र यांच्या समर्थकांसह ब्राहमो समाजातून बाहेर पडले आणि त्यांनी 1866 रोजी नवीन संस्थेची स्थापना केली ती संस्था म्हणजे भारतीय ब्राह्मो समाज होय.
5) इतर धर्मियांच्या धर्मग्रंथातील वचन आणि स्त्रोतांचे सामूहिक प्रार्थनेत पठण करण्यात आले.
6) रविवार साप्ताहिक उपासनेचा दिवस कळविण्यात आला.
7)ब्राह्मो समाजाच्या सहा कलमांमध्ये आणखी तीन कलामंची भर घालण्यात आली. ती कलमे असे आहेत.
अ) ब्राह्म धर्म हा नवा विश्वधर्म हाये त्यात सर्व धर्माचे सार आहे.
आ) पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचे एकसंघ स्वरूप म्हणजे ईश्वर होईल तोच माता पिता होय.
इ) अंत: प्रेरणा, निसर्ग आणि प्रतिभा संपन्न व्यक्ती यांच्यापासून ईश्वराचे ज्ञान मिळते.
8) समाजसुधारणेसाठी केशवचंद्र सेन यांनी फॉर्म असोसिएशन ही स्वतंत्र संस्था स्थापन केली.
9) भारतीय ब्राह्मो समाजाच्या पुढाकाराने विधवा विवाह व आंतरजातीय विवाहांना कायदेशीर मान्यता देणारा ‘ब्राह्म मॅरेज ॲक्ट’ 1872 रोजी अस्तित्वात आला.
साधारण ब्राहमो समाज:-
1) केशव चंद्र यांनी आपल्या 13 वर्षाच्या मुलीचा विवाह 16 वर्षाच्या मुलाशी केला त्यामुळे विश्वनाथ शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी नवा ‘साधारण ब्राहमो समाजाची 1881 मध्ये स्थापना केली.
2) कोणत्या एका व्यक्तीचा ब्राहमो समाजावर सर्वाधिकार असू नये म्हणून साधारण ब्राह्मो समाजाची स्थापना करण्यात आली.
3) सर्व संमती किंवा समान दृष्टीकोण असल्याशिवाय कोणत्याही कार्यक्रम स्वीकारल्या जाणार नाही असे ठरविण्यात आले.
4) ईश्वरचंद्र विद्यासागर यांना समाजसुधारणेच्या बाबत राजा राम मोहन राय यांचे वारसदार म्हटले जाते.
5) मी वास्तव जगाचा आणि त्यात राहणाऱ्या जीवनाचा विचार करतो. माणुसकीने वागावे हाच माझा धर्म समजतो असे विद्यासागर म्हणत.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा