मराठी वाक्प्रचार व त्याचा अर्थ

         मराठी भाषेत काही शब्दांचा किंवा शब्द समूहांचा वाक्यात वापर करतांना त्याच्या नियमित वापरातील अर्थ ऐवजी वेगळा आणि विशिष्ट अर्थ अभिप्रेत असतो या शब्द समुहास वाक्प्रचार असे म्हणतात. वाक्प्रचार आणि म्हणी यांना भाषेतील संप्रदान म्हणून ओळखले जाते. वाक्प्रचाराचा नेहमीचा शब्दशः अर्थ अभिप्रेत नसून त्यात दडलेला भावार्थ घ्यावा लागतो. खालील लेखात अवयवावर आधारित तसेच इतर एकूण २९० वाक्प्रचार देण्यात आलेले आहे.

Marathi vakprachar v tyacha arth (मराठी वाक्प्रचार व त्याचा अर्थ विविध उदाहरणे)

   अवयवावर आधारित वाक्प्रचार

   1) अंग चोरणे - फारच थोडे काम करणे.
   2) अंगात वीज संचारणे - अचानक बळ येणे.
   3) अंगाची लाहीलाही होणे - अतिशय संताप होणे.
   4) अंगावर शेकणे - नुकसान सोसावे लागणे.
   5) अंगवळणी पडणे - सवय होणे.
   6) ऊर भरून येणे - गदगदून येणे.
   7) कपाळ फुटणे - दुदैव ओढवणे.
   8) कपाळ उठणे - कपाळ दुखू लागणे, त्रास होणे.
   9) कपाळ मोक्ष होणे - मरणे, मृत्यू ओढवणे.
   10) कपाळाला हात लावणे - हताश होणे.
   11) काढता पाय घेणे - निघून जाणे.
   12) कानउघडणी करणे - चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे.
   13) कान उपटणे - कडक शब्दात समज देणे.
   14) कान किटणे - सतत एका गोष्टीबद्दल ऐकून कंटाळणे.
   15) कान टोचणे - खरमरीत शब्दात बोलणे
   16) कान देणे - लक्षपूर्वक ऐकणे.
   17) कान निवणे - ऐकून समाधान होणे.
   18) कान फुटणे - ऐकू न येणे.
   19) कान फुंकणे - चुगली / चहाडी करणे.
   20) कान लांबणे - अतिशहाणा होणे.
   21) कानाने हलका असणे - कशावरही पटकन विश्वास ठेवणे.
   22) कानामागे टाकणे - दुर्लक्ष करणे.
   23) कानाला खडा लावणे - एखादी गोष्ट ठरवून टाळणे.
   24) कानावर हात ठेवणे - नाकबूल करणे.
   25) कानीकपाळी ओरडणे - एकसारखे बजावून सांगणे.
   26) केसाने गळा कापणे - घात करणे.
   27) कंठ दाटून येणे - गहिवरून येणे.
   28) कंठस्नान घालणे - शिरच्छेद करणे.
   29) कंठाशी प्राण येणे - कासावीस होणे.
   30) कंबर कसणे - जिद्दीने तयार होणे.
   31) कंबर खचणे - धीर सुटणे.
   32) कानावर घालणे - सांगणे, ऐकवणे.
   33) कानोसा घेणे - अंदाज घेणे, चाहूल घेणे.
   34) खांद्याला खांदा भिडणे - सहकार्याने एकजुटीने काम करणे.
   35) गळा काढणे - मोठ्याने रडणे.
   36) गळा गोवणे / गुंतणे - दुसऱ्याला अडचणीत आणणे.
   37) गळ्यात गळे घालणे - खूप मैत्री करणे.
   38) गळ्यात पडणे - मनाविरुद्ध लादले जाणे.
   39) गळ्यातला ताईत होणे - अत्यंत आवडता होणे.
   40) गळ्यापर्यंत बुडणे - डबघाईला येणे / कर्जबाजारी होणे.
   41) चेहरा पडणे - लाज वाटणे, खजिल होणे, शरम वाटणे.
   42) छाती दडपणे - घाबरून जाणे.
   43) छातीठोकपणे सांगणे - खात्रीपूर्वक सांगणे.
   44) जिभेचा पट्टा चालवणे - एकसारखे बोलणे.
   45) जिभेला हाड नसणे - वाट्टेल ते बोलणे / अद्वातद्वा बोलणे.
   46) जीभ सैल सोडणे- वाटेल तसे बोलणे.
   47) जीव की प्राण असणे - खूप आवडणे.
   48) डोक्यावर खापर फोडणे - निर्दोष माणसावर दोष टाकणे.
   49) डोक्यावर बसवणे - फाजिल लाड करणे.
   50) डोक्यावर हात ठेवणे - आशीर्वाद देणे.
   51) डोळा असणे - पाळत ठेवणे.
   52) डोळा लागणे - झोप येणे.
   53) डोळे उघडणे - अनुभवाने सावध होणे.
   54) डोळे झाक करणे - दुर्लक्ष करणे.
   55) डोळे निवणे - समाधान होणे, पाहून बरे वाटणे.
   56) डोळे पांढरे होणे - बेशुद्ध होणे, मानसिक धक्का बसणे.
   57) डोळे लावून बसणे - वाट पाहत बसणे.
   58) डोळ्यात अंजन घालणे - चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे.
   59) डोळ्यात खुपणे - मत्सर करणे, सहन न होणे.
   60) डोळ्यात धूळ फेकणे - देखत फसवणे.
   61) डोळ्यांतून गंगायमुना येणे - अश्रू येणे.
   62) डोळ्याला डोळा न लागणे - झोप न येणे.
   63) डोळ्यांचे पारणे फिटणे - समाधान होणे, पाहून आनंदीत होणे.
   64) डोळ्यांतून थेंब न काढणे- न रडणे.
   65) तळपायाची आग मस्तकात जाणे - अतिशय क्रोध चढणे.
   66) तोंड काळे करणे - कायमचे निघून जाणे.
   67) तोंडघशी पडणे - विश्वासघात करणे.
   68) तोंड घालणे - मध्येच बोलणे.
   69) तोंडचे पाणी पळणे - अतिशय घाबरणे.
   70) तोंड टाकणे - अद्वातद्वा बोलणे, वाटेल तसे टाकून बोलणे.
   71) तोंडदेखले बोलणे - उपचार म्हणून बोलणे.
   72) तोंड देणे - सामना देणे, लढाईसाठी सिद्ध होणे.
   73) तोंड फिरवणे - नाराजी व्यक्त करणे.
   74) तोंड भरून बोलणे - मनाचे समाधान होईपर्यंत बोलणे.
   75) तोंड सांभाळून बोलणे - जपून बोलणे.
   76) तोंड सुख घेणे - भांडणे.
   77) तोंड सोडणे- अमर्याद बोलणे, सतत बोलणे.
   78) तोंडाची वाफ दवडणे - वायफळ बडबड करणे.
   79) तोंडात देणे - धोबाडीत देणे / मारणे.
   80) तोंडात बोट घालणे - आचर्यचकित होणे.
   81) तोंडात शेण घालणे- निंदा करणे.
   82) तोंडाला कुलूप घालणे - गप्प बसणे, काही न बोलणे.
   83) तोंडाला तोंड देणे – भांडणे.
   84) तोंडाला पाणी सुटणे - हाव निर्माण होणे.
   85) तोंडावर सांगणे- समक्ष सांगणे.
   86) दात काढणे - दुसऱ्याला हसणे.
   87) दात धरणे - द्वेष करणे.
   88) दात पडणे - फजिती होणे.
   89) दात पाडणे - वादात पराभूत करणे,
   90) दात विचकणे - निर्लज्जपणे हसणे.
   91) दाताच्या कण्या करणे - वारंवार विनंती करणे.
   92) दाती तृण धरणे - शरण जाणे.
   93) नजर चुकवणे - फसवणे, न दिसेल अशी हलचाल करणे.
   94) नाक उडवणे- थट्टा / उपहास करणे.
   95) नाक कापणे - अपमान करणे.
   96) नाक खुपसणे - नको त्या गोष्टीत उगाच सहभाग करणे.
   97) नाक घासणे - लाचार होऊन माफी मागणे.
   98) नाक ठेचणे - खोड मोडणे.
   99) नाक मुठीत घेऊन जाणे - नाईलाजाने शरण जाणे.
   100) नाक मुरडणे - नापसंती दाखविणे.
   101) नाक वर करून चालणे - ताठ्यात राहणे, आपलेच खरे करणे.
   102) नाकी नऊ येणे - मोठी दगदग होणे, दमणे.
   103) नाकाने कांदे सोलणे - जादा शहाणपण दाखवणे.
   104) पाठ थोपटणे - शाबासकी देणे.
   105) पाठ थोपटून घेणे - दुसऱ्यांकडून वाहवा मिळवणे.
   106) पाठ दाखविणे - समोरून पळून जाणे.
   107) पाठ पुरवणे - सारखे मागे लागणे.
   108) पाठ मऊ करणे - फार मारणे.
   109) पाठीचे धिरडे करणे - फार मारणे.
   110) पाठीला पोट लागणे - उपाशी राहिल्याने हडकुळा होणे.
   111) पाय काढणे - निघून जाणे.
   112) पाय घसरणे - तोल जाणे, मोहात फसणे.
   113) पाय धरणे - शरण जाणे, माफी मागणे.
   114) पाय पसरणे - हळूहळू ताबा मिळवणे.
   115) पाय फुटणे - लंपास होणे.
   116) पायबंद घालणे - आळा घालणे.
   117) पाय मोकळे करणे - फिरायला जाणे.
   118) पोटात आग पडणे - खूप भूक लागणे.
   119) पोटात कावळे कोकलणे / ओरडणे - खूप भूक लागणे.
   120) पोटात घालणे - क्षमा करणे.
   121) पोटात ठेवणे - गुपीत सांभाळणे.
   122) पोटात धस्स होणे - अचानक भीती वाटणे.
   123) पोटात शिरणे - विश्वास संपादन करणे.
   124) पोटाला चिमटा देणे - कमी खाऊन राहणे.
   125) पोटावर पाय देणे - रोजंदारी बंद करणे/होणे.
   126) पोटावर मारणे - नुकसान करणे.
   127) पायावर उभे राहणे - स्वावलंबी होणे, स्वतंत्र होणे.
   128) पाठबळ असणे - आधार असणे.
   129) पोट दुखणे (हसून हसून) - खूप हसणे.
   130) प्राणापेक्षा जपणे - स्वत:च्या जीवापेक्षा एखादी गोष्ट सांभाळणे.
   131) बोटावर नाचवणे- हवे तसे खेळवणे, पूर्ण ताब्यात घेणे.
   132) मनात अढी धरणे – एखाद्या विषयी मनात राग धरणे.
   133) मान कापणे - मोठी हानी होणे.
   134) मानेवर सुरी ठेवणे - मरणाचा धाक दाखवून काम करवून घेणे.
   135) मांडीवर घेणे - दत्तक घेणे.
   136) मुठीत असणे – ताब्यात असणे.
   137) रक्त आटवणे - अति कष्ट करणे.
   138) हाडाची काडे करणे - अति श्रम करणे, अतिशय मेहनत करणे
   139) हाडीमासे खिळवणे - अंगी बाणणे.
   140) हाडे खिळखिळी होणे - भरपूर चोप देणे.
   141) हाडे निघणे - कृश होणे.
   142) हात आखडणे - खर्चात कपात करणे.
   143) हात घाईवर येणे- मारामारीची पाळी येणे.
   144) हाताचा मळ असणे - एखादी गोष्ट सहज करता येणे.
   145) हात चालवणे - भरभर काम करणे.
   146) हात झटकणे - नामानिराळा होणे.
   147) हात टाकणे - मारणे.
   148) हात टेकणे - नाईलाजाने शरण जाणे.
   149) हात दाखविणे - मार देणे, फसवणे.
   150) हात देणे - मदत करणे.
   151) हात मारणे - ताव मारणे, भरपूर खाणे.
   152) हातात निरोटी देणे - भीक मागायला लावणे.
   153) हाता तोंडाशी गाठ पडणे - जेमतेम खाण्यास मिळणे.
   154) हातापाया पडणे - लाचारीने विनवण्या करणे.
   155) हातावर तुरी देणे - डोळ्यादेखत फसवून पळणे
   156) दोन हात करणे - सामना करणे, लढाई करणे.
   157) हृदय भरून येणे- गदगदून येणे, गहिवरून येणे.
   158) घर डोक्यावर घेणे - गोंगाट करणे.
   159) जिवाचे रान करणे - प्रयत्नांनी पराकाष्टा करणे.
   160) जिवात जीव येणे - हायसे वाटणे, सुटकेची भावना निर्माण होणे.
   161) जिवाला जीव देणे - वाटेल ते मोल देऊन दुसऱ्याला मदत करणे.
   162) जीव तीळतीळ तुटणे - हळहळणे.
   163) जीव भांड्यात पडणे - सुटकेची भावना निर्माण होणे.

    इतर वाक्प्रचार

   164) अन्नान्न दशा येणे - खायला न मिळणे.
   165) अभय देणे - भीती नाहीशी करण्यासाठी धीर देणे.
   166) अन्नाला मोताद होणे - खायला न मिळणे.
   167) अन्नास जागणे - उपकार स्मरणे.
   168) आकाश पाताळ एक करणे - प्रयत्नांची परिसीमा गाठणे.
   169) आग लावणे - भांडण लावणे.
   170) आगीत उडी घेणे - स्वतःहून संकटात पडणे.
   171) आगीत तेल ओतणे - आधीच्या भांडणात आणखी भर टाकणे.
   172) घर चालवणे - कुटुंबाचा निर्वाह करणे.
   173) घरोबा असणे - जिव्हाळ्याचा संबंध असणे.
   174) आभाळ कोसळणे - मोठे संकट कोसळणे.
   175) आभाळ फाटणे - सर्व बाजूंनी संकटे कोसळणे.
   176) आहारी जाणे - ताब्यात जाणे.
   177) आडवे होणे - झोपणे.
   178) आढेवेढे घेणे - नाही नाही म्हणणे.
   179) उंटावरून शेळ्या हाकणे - प्रत्यक्ष कार्यापासून दूर राहून नुसत्या
            सूचना करणे.
   180) ओहोटी लागणे - उतरती कळा लागणे.
   181) अंत पाहणे - अखेरीची मर्यादा गाठेपर्यंत कस पाहणे.
   182) कळ लावणे - भांडणे करणे.
   183) कचाट्यात सापडणे - तावडीत सापडणे.
   184) काट्याने काटा काढणे - दुष्टाकडून दुष्कर्त्याला शासन करणे
   185) कुरघोडी करणे - दुसऱ्यापेक्षा वरचढ होणे.
   186) कडेलोट करणे - ढकलून देणे.
   187) कुंपणाने शेत खाणे - ज्याच्या हाती संरक्षणाचे काम आहे 
           त्यानेच नुकसान करणे.
   188) कोंड्याचा मांडा करणे - काटकसरीने पण समाधानाने राहणे
   189) खजिल होणे - लाज वाटणे, शरम वाटणे.
   190) खडे चारणे - पराभव करणे.
   191) खडे फोडणे - दुसऱ्याला दोष देत राहणे.
   192) खोड मोडणे - अद्दल घडविणे.
   193) ग ची बाधा होणे - गर्व होणे.
   194) गंध नसणे- अजिबात ज्ञान नसणे.
   195) गर्क असणे - गुंतून राहणे, मन रंगणे, मग्न होणे.
   196) गट्टी जमणे- मैत्री होणे.
   197) गहिवरून जाणे - मनातून गलबलून जाणे.
   198) घर चालवणे - कुटुंबाचा निर्वाह करणे.
   199) घाम जिरवणे - कष्ट करणे, घाम गाळणे.
   200) घोकमपट्टी करणे - पाठांतर करणे, तेच तेच पुन्हा म्हणणे.
   201) चाल करून येणे - हल्ला करणे.
   202) चाहूल घेणे - अंदाज घेणे, लक्ष देऊन ऐकणे, कानोसा घेणे.
   203) चुळबुळ करणे - अस्वस्थ होऊन हालचाल करणे.
   204) चंग बांधणे - निश्चय करणे.
   205) जंग जंग पछाडणे - कसून शोध घेणे.
   206) जळून खाक होणे - पूर्ण जळणे, राख होणे.
   207) झुंबड उडणे - गर्दी होणे.
   208) टेंभा मिरवणे - ऐट दाखविणे.
   209) टोमणा मारणे - खोचक बोलणे.
   210) टंगळ मंगळ करणे - काम टाळणे, चालढकल करणे.
   211) डाव साधणे - जिंकणे, मतलब साधणे.
   212) डाळ न शिजणे - काम न साधणे.
   213) तणतणत निघून जाणे - रागाने निघून जाणे.
   214) तमा नसणे - पर्वा नसणे.
   215) तावडीतून सुटणे - कचाट्यातून सुटणे.
   216) ताकास तूर लागू न देणे - थांगपत्ता लागू न देणे.
   217) तिखट बोलणे - जहाल बोलणे.
   218) तुटून पडणे - इरेस पेटून कामाचा फडशा पाडणे, एखाद्यावर
            अचानक हल्ला करणे.
   219) तिळपापड होणे - अतिशय संताप होणे.
   220) तोड नसणे - योग्यतेचे दुसरे नसणे.
   221) दवंडी पिटणे - जाहीर करणे, सर्वांना सांगणे.
   222) दिवस पालटणे - परिस्थिती बदलणे.
   223) दुथडी भरून वाहणे - दोन्ही तीरावरून पाणी वाहून जाणे.
   224) धडकी भरणे - खूप भीती वाटणे.
   225) धडगत नसणे - संकटातून सुटण्याची आशा नसणे.
   226) धाबे दणाणणे - खूप घाबरणे.
   227) धारातीर्थी पडणे - वीरमरण येणे
   228) धुळीला मिळणे - नाश होणे.
   229) धूम ठोकणे - पळून जाणे.
   230) धूळ चारणे - पूर्ण पराभव करणे.
   231) नाव मिळविणे - किर्ती मिळविणे.
   232) नाव सोनेरी अक्षरात उमटणे - किर्ती होणे, अजरामर होणे.
   233) निपचित पडणे - स्थिर राहणे, हालचाल न करता पडणे.
   234) पदरमोड करणे - स्वत:च्या बचतीतून दुसऱ्यासाठी खर्च करणे.
   235) पराचा कावळा करणे - अतिशयोक्ती करणे.
   236) पसार होणे - पळून जाणे, गायब होणे.
   237) पाचावर धारण बसणे - भयभीत होणे.
   238) पाणी पडणे - वाया जाणे.
   239) पाणी पाजणे - पराजित करणे.
   240) पाणी सोडणे - त्याग करणे.
   241) पाण्यात पाहणे - द्वेष करणे.
   242) पारडे फिरणे - परिस्थिती एकदम बदलणे.
   243) पारा चढणे - संताप होणे.
   244) पित्त खवळणे - खूप राग येणे.
   245) पोपटपंची करणे - अर्थ न समजता पाठ करणे.
   246) पोबारा करणे - पळून जाणे.
   247) पोरकी होणे - अनाथ होणे.
   248) पैसे झाडाला लागणे - सहजपणे अतोनात पैसे मिळणे.
   249) फडशा पाडणे - खाऊन टाकणे,
   250) बस्तान बसवणे - स्थिर होणे.
   251) बुचकळ्यात पडणे - गोंधळ होणे, गोंधळून जाणे.
   252) भान हरपणे - रंगून जाणे, तल्लीन होणे.
   253) थरकाप होणे - खूप घाबरणे,
   254) भंडावून सोडणे - गोंधळून टाकणे.
   255) मरणाला मिठी मारणे - स्वत:हून मरण स्वीकारणे.
   256) मार्ग काढणे - इलाज शोधून काढणे, शोध घेणे.
   257) माशी शिंकणे - कामात विघ्न आणणे.
   258) माश्या मारणे - रिकामे बसणे.
   259) मागावर असणे - शोधात असणे, पाठीमागे असणे,
           पाळतीवर असणे.
   260) मात करणे - विजय मिळवणे.
   261) मात्रा न चालणे - इलाज न चालणे.
   262) मूग गिळणे - दुर्लक्ष करून गप्प बसणे.
   263) मेतकूट जमणे - खूप मैत्री होणे.
   264) रंगत येणे - खूप मजा येणे.
   265) लष्कराच्या भाकऱ्या भाजणे - विनाकारण नको त्या
            गोष्टी करणे.
   266) लालूच दाखवणे - मोहात पाडणे.
   267) वचपा काढणे - अद्दल घडविणे.
   268) वाट लागणे - नष्ट होणे, नुकसान होणे.
   269) वाटेस जाणे - खोडी काढणे.
   270) वाकुल्या दाखवणे - चिडवणे.
   271) वाली भेटणे - आधार देणारा माणूस भेटणे.
   272) वीरश्री संचारणे - विजयाची उमेद निर्माण करणे.
   273) शोभा करणे - वाभाडे काढणे.
   274) शोभा होणे - नाचक्की होणे.
   275) शंख करणे - आरडा ओरडा करणे.
   276) सळो की पळो करणे - सतावून सोडणे.
   277) सवड मिळणे - मोकळा वेळ मिळणे.
   278) सुसाट पळणे - वेगात पळणे, जोरात पळणे.
   279) सुळसुळाट होणे - सर्वत्र गजबजाट होणे.
   280) सुळावर चढणे - फाशी होणे.
   281) सैरावैरा पळणे - वाट मिळेल तिकडे पळणे.
   282) हट्टास पेटणे - स्वत:चे खरे करण्यासाठी वाटेल ते करणे.
   283) हमरीतुमरीवर येणे - भांडणाला सुरवात करणे.
   284) हरभऱ्याच्या झाडावर चढविणे - खोटी स्तुती करणे.
   285) हाती काही न लागणे - काहीच फायदा न होणे.
   286) हाय खाणे - धास्ती घेणे.
   287) हां हां म्हणता पसरणे - अगदी थोड्या वेळात
            सगळ्यांना कळणे.
   288) हुलकावणी देणे - फसवणे, चकवणे.
   289) हेळसांड करणे - आबाळ करणे.
   290) होळी करणे - चांगल्या वस्तूंचा नाश करणे.

Share on Google Plus

About Vikas Dev

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.