शब्द समूहाबद्दल एक शब्द यामध्ये अनेक शब्द किंवा शब्द समूहासाठी फक्त एक शब्द वापरलेला असतो. यामधील शब्दाचा अर्थ लक्षात येण्याकरीता जो शब्द समूह वापरला आहे तो लक्षात घेणे गरजेचे असते. सामान्यतः मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षा, mpsc परीक्षा व स्कॉलरशिप, नवोदय आशा परीक्षेमध्ये यामधील एखादा प्रश्न हमखास असतो. त्याकरिता याचे वाचन करणे आवश्यक आहे. हा विभाग समजण्यास सोपा आहे. तरी एक वेळ वाचन करणे गरजेचे आहे.
- गावाच्या कामकाजाची जागा - चावडी
- सैन्याची चक्राकार केलेली रचना - चक्रव्यूह
- चार रस्ते एकत्र येतात ती जागा - चव्हाटा / चौक.
- किल्ल्याच्या भोवतीची भिंत - तट.
- हालअपेष्टा सहन करण्याचा गुण - तितिक्षा.
- एकाकडून दुसऱ्याकडे पुर्वापार चालत आलेली गोष्ट - दंतकथा.
- सामाजिक सेवेसाठी मोफत पाणी मिळण्याची सोय - पाणपोई
- शत्रूला जाऊन मिळालेला - घरभेदी फितुर.
- निरपेक्ष कामाबद्दल मानाने दिलेले धन - मानधन.
- शंकरास पुजणारा - शैव.
- स्वतःचा स्वार्थ पाहूण काम साधणारा - अप्पलपोटा.
- ज्याला कधीही मरण नाही असा - अमर.
- याआधी कधीही न घडलेले - अभूतपूर्व.
- समाजातील समानतेसाठी प्रयत्न करणारा - साम्यवादी.
- नाटकाच्या सुरुवातीस होणारे ईशस्तवन गीत - नांदी.
- ग्रहण व संक्रांती नंतरचा दुसरा दिवस - कर.
- अर्थबोध न होता केलेले पठण - पोपटपंची.
- क्षमा करण्याइतके मोठे मन / वृत्ती असणारा - क्षमाशील.
- मोजकाच आहार नियमित घेणारा - मितहारी.
- कलेत रस / आवड असणारा - रसिक
- दरवर्षी प्रकाशित होणारे - वार्षिक.
- मिळून मिसळुन वागणारा - मनमिळावू
- माकडांचा खेळ दाखविणारा - मदारी.
- शेतातून निघणारी अरुंद वाट - पायवाट/पाणंद.
- आई- वडिलांचे छत्र नसणारा - पोरका.
- लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य - लोकशाही.
- सर्वांना वाचनासाठी खुले केलेले दालन - वाचनालय.
- चारही बाजूंनी पाण्याने व्यापलेला प्रदेश - बेट
- स्वतःच्या मर्जीने वागणारा - मनमौजी.
- हत्तींना बांधण्याची जागा - हत्तीखाना.
- पाहण्याची क्रिया / भूमिका करणारे - प्रेक्षक
- ऐकण्याची क्रिया / भूमिका करणारे - श्रोते.
- पंधरा दिवसांचा कालावधी - पंधरवडा.
- न्याय देण्याच्या बाबतीत निष्ठपक्का असणारा - न्यायनिष्ठूर.
- अनेक प्रकारची - परोपजीवी.
- अनेक प्रकारची सोंगे घेणारा - बहुरुपी.
- सभोवतालया प्रदेश - परिसर.
- चोफ असलेला गाड़ा - रणगाडा.
- दुपारच्या जेवणात केलेली निंदा - वामकुक्षी.
- जी जन्मलेला - अग्रज.
- जिवाला जीव देणारा - जिवलग.
- धान्य साठविण्यासाठी तयार केलेली जागा - गोदाम.
- मुर्ती जिथे स्थापित केलेली असते तो भाग - गाभारा.
- तानवाळांना झोपविण्यासाठी गायलेले गीत - अंगाईगीत.
- विशिष्ट मर्यादा ओलांडून केलेले कृत्य - अतिक्रमण.
- कमळाप्रमाणे सुंदर डोळे असणारी - कमलाक्षी.
- मागून जन्मलेला - अनुज.
- कानांना गोड / सुरेल वाटणारे - कर्णमधुर.
- वेगवेगळ्या राष्ट्रातील - आंतराराष्ट्रीय.
- उदयाला येत असलेला - उदयोन्मुख
- पिण्यायोग्य असलेला द्रवपदार्थ - पेय.
- दुसऱ्याच्या मनातील अचूक ओळखणारा - मनकवडा.
- साच वडांचा समूह असलेला भाग - पंचवटी.
- रात्री भ्रमण करणारे - निशाचर.
- दररोज प्रकाशित होणारे - दैनिक.
- प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची इच्छा असणारे - जिज्ञासू.
- सापांचा खेळ दाखविणारा - गारुडी.
- गावातील कारभार पंचामार्फत चालविला जातो ती संस्था - ग्रामपंचायत.
- दैवावर / नशीबावर विश्वास ठेवणारा -दैववादी.
- राण्यात राहणारे - जलचर.
- पाण्यात व जमिन या दोन्हीत राहणारे - उभयचर.
- मनाला शरीराला आल्हाद देणारा - आल्हाददायक.
- कधी नाश न होणारा - अविनाशी.
- गुरामुळे नुकसान झालेल्या प्रदेशातील लोक - पूरग्रस्त.
- पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत - नखशिखांत.
- खालून जाणारी युध्दनौका - पाणबुडी.
- आपल्या देशापासून दूर आलेला - निर्वासित.
- विश्वास ठेवणारा - आस्तिक
- नाही असे मानणारा विश्वास न ठेवणारा - नास्तिक.
- समाजाने नाकारले आहे असा - बहिष्कृत.
- स्वतः काम स्वत करणारा - स्वावलंबी.
- स्वत्वाचा अभिमान असणारा - स्वाभिमानी.
- डोंगरातील उंचावरून कोसळणारे पाणी - धबधबा.
- चंद्राप्रमाणे मुख असणारी - चंद्रमुखी.
- दोन्ही किनारे भरून वाहणारी नदी - दुथडी.
- नवऱ्या मुलाची आई - वरमाय.
- जग जिंकून काढणारा - जगज्जेता.
- अर्थ नसलेल्या गोष्टी किंवा गप्पा - भाकडकथा.
- लोखंडाच्या वस्तु बनविणारा - लोहार.
- लाखो रुपयांची संपत्ती असणारा - लखपती लक्षाधीश.
- ज्याची पत्नी मरण पावली आहे असा - विधुर.
- जिचा पती मरण पावला आहे अशी - विधवा.
- स्वतःचा विचार करणारा - स्वार्थी.
- ज्याला कुणीही वारस नाही असा - बेवारशी.
- कसलीही अपेक्षा न ठेवता प्रेम करणारा - निरपेक्ष.
- पश्चिमेकडील देशांमधील लोक - पाश्चिमात्य.
- सोन्याचे दागिने घडविणारा - सोनार.
- लाकडाच्या वस्तू बनविणारा - सुतार.
- दर आठवडयाला भरणारा बाजार - आठवडी बाजार.
- कुंजात विहार करणारा - कुंजविहारी (कृष्ण).
- सूर्याचे उत्तरेकडे सरकणे - उत्तरायण.
- इतरांचे हित चिंतणारा/इतरांच्या हिताचा विचार करणारा - हितचिंतक.
- रत्नांनी सजविलेले / मढविलेले - रत्नजडित.
- व्याख्यान देणारा - व्याख्याता.
- समाजात चांगल्या सुधारणा घडवून आणणारा - सुधारणावादी.
- शंभर वर्षे जगणारा - शतायुषी.
- एकाच विचाराने वा ध्येयाने एकत्र आलेल्या लोकांचा समूह - संघटना.
- वर्तमानपत्रात बातमी आणून देणारा - वार्ताहर.
- लोकांमध्ये आवडती असणारी व्यक्ती - लोकप्रिय.
- इप्सित ध्येय गाठण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती असणारा - महत्त्वाकांक्षी.
- लोकांनी मान्यता दिलेला - लोकमान्य.
- क्षणभर टिकणारे - क्षणभंगूर.
- केलेले उपकार जाणणारा - कृतज्ञ.
- नदीप्रवाह जेथून सुरु होतो ते ठिकाण - उगम.
- केलेले उपकार न जाणणारा - कृतघ्न.
- कोणत्याही ठिकाणी एकदम बदल घडवून आणणारा - क्रांती.
- एक धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारणे - धर्मातर.
- लोकांच्या मताने चाललेले राज्य - प्रजासत्ताक.
- मुद्याला धरून असलेले - मुद्देसूद.
- ज्याने मृत्युवर ताबा मिळविला आहे असा - मृत्युंजय.
- जिल्हयाचा कारभार पाहणारी संस्था - जिल्हा परिषद.
- ज्याच्या हातात चक्र आहे असा - चक्रपाणि.
- गुरुकडे आपल्या बरोबर ज्ञान घेणारा - गुरुबंधू.
- अचूकपणे गुण ओळखणारा - गुणग्राहक.
- चिरकाल जगणारा - चिरंजीवी.
- जेथे जन्म झाला तो देश - जन्मभूमी.
- जेथे अविरतपणे कार्य केले तो प्रदेश - कर्मभूमी.
- सूर्याचे दक्षिणेकडे सरकणे - दक्षिणायन.
- जिकडे वाट दिसेल तिकडे जाणे - सैरावैरा.
- जिची कमर सिंहाच्या कमरेप्रमाणे आहे अशी - सिंहकटी.
- कुठल्याही रोगावर अचूक लागू पडणारा उपाय - रामबाण.
- चारित्र्यावर कुठलाही डाग / बटटा नसलेला - निष्कलंक.
- तिथी, नक्षत्र, योग, गुण, दोष यासर्वांची माहिती असलेली पुस्तिका - पंचांग.
- जहाजाला दिशा दाखवणारा दिवा - दिपस्तंभ.
- आधुनिक विचारांची कास धरणारा - पुरोगामी.
- जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे ऐटबाज / डौलदार आहे अशी - गजगामिनी.
- डोंगराच्या आतून तयार केलेला आरपार रस्ता - बोगदा.
- मुर्तीची पुजा करणारे - मूर्तिपुजक.
- वाडवडिलांपासून चालत आलेले - वडिलोपार्जित.
- कधीही नाश न पावणारे - शाश्वत.
- सत्याचा आग्रह धरणारे - सत्याग्रही.
- ज्याची तुलना करता येत नाही असा - अतुलनीय.
- संस्थेची उभारणी करणारा -संस्थापक.
- इतरांना मार्ग दाखविणारा - मार्गदर्शक.
- वनात राहणारे लोक - वनवासी.
- शहरात राहणारे लोक - शहरी.
- डोंगरात भ्रमण करणारे लोक -गिर्यारोहक.
- हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत - आसेतुहिमाचल
- भाषण करण्याची जागा - व्यासपीठ.
- देशासाठी प्राणांचा त्याग करणारे - हुतात्मा.
- मनातल्या मनात होणारी घुसमट - कोंडमारा.
- जन्मजात श्रीमंत – गर्भश्रीमंत.
- पाऊस अजिबात न पडणे - अवर्षण.
- विराजमान झालेला - अधिष्ठित.
- आकाशाला भिडणारे - गगनभेदी.
- कार्यात तत्पर असणारा - कार्यतत्पर.
- मोठया प्रमाणात दानधर्म करणारा - दानशूर.
- कोणत्याही प्रकारचे व्यसन नसणारा - निर्व्यसनी.
- लोखंडाचे सोने करणारा काल्पनिक दगड - परीस.
- मनातील इच्छा- मनोरथ/ईप्सित.
- हत्तीला काबूत ठेवून त्याची देखभाल करणारा - माहूत.
- दोन किंवा अधिक नदया एकत्र येतात ते ठिकाण - संगम.
- कोणत्याही परिस्थितीत आपली बुद्धी स्थिर ठेवणारा - स्थितप्रज्ञ.
- मोजता येत नाही असे -अगणित, असंख्य अनंत.
- एकाच वेळी अनेक गोष्टीत लक्ष ठेवणारा - अष्टावधानी.
- आठ हात असणारी देवी - अष्टभुजा.
- टिकून राहण्याचा गुणधर्म - चिकाटी.
- शरीराच्या तंदुरुस्तीसाठी देण्यात येणारा आहार - खुराक.
- पुर्वीपासून राहणारे - आदिवासी.
- वाटेल तसा पैसा खर्च करणे - उधळपटटी.
- आजारी रुग्णांची सेवा करणारी - परिचारीका.
- जमिनीवर राहणारे प्राणी - भूचर.
- इच्छित गोष्ट देणारे वृक्ष - कल्पवृक्ष.
- कवितेची रचना करणारी - कवयित्री
- डोंगरात कोरण्यात आलेले मंदिर - लेणी.
- तिन रस्ते एकत्र येतात ती जागा - तिठा.
- शत्रूपक्षाकडील बातमी गुप्तपणे काढून आणणारा - गुप्तहेर/हेर/खबऱ्या.
- शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणारे कर्ज - तगाई.
- घोडे बांधण्याची जागा - पागा.
- ज्यातून आरपार वस्तू दिसू शकते असे - पारदर्शी.
- दगडावर कोरीव काम करणारा - शिल्पकार.
- जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा - क्षितीज.
- नेहमी एकाच गोष्टीचा नाद करणारा - नादिष्ट.
- गाण्याचे बोल लिहीणारा - गीतकार.
- गाण्याचे बोल तालबध्द करणारा - संगीतकार.
- तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला लेख -ताम्रपट.
- दगडावर कोरलेले लेख -शिलालेख.
- दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारे - पाक्षिक.
- नाणी तयार करण्याचा कारखाना - टाकसाळ.
- गावात राहणारे लोक - ग्रामीण.
- भूकंपामुळे नुकसान झालेले लोक - भूकंपग्रस्त.
- खूप माहिती असणारा - बहुश्रुत
- सपाट जमिनीवर बांधलेला किल्ला - भुईकोट.
- दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे नियतकालिक - षण्मासिक.
- वाट दर्शविणारा / दाखविणारा - वाटाडया.
- हरिणीच्या डोळयासारखे डोळे असणारी स्त्री - मृगनयना.
- सहज साध्य होण्यासारखे - सुसाध्य.
- वाचता लिहता न येणारा/ अक्षर ओळख नसलेला - निरक्षर.
- सर्व इच्छा पुर्ण करणारी गाय - कामधेनू .
- जेथे कुस्ती खेळली जाते ती जागा - आखाडा.
- शिल्लक राहीलेले - उर्वरीत.
- कमी आयुष्यमान असणारा - अल्पायुषी.
- अक्षर ओळख असलेला - साक्षर
- चित्रपटात किंवा नाटकात अभिनय करणारा - अभिनेता.
- हृदयाला भिडणारे / स्पर्श करणारे - ह्दयस्पर्शी.
- आपल्या मनाने / इच्छेने सेवाभाव वृत्तीने काम करणारा - स्वयंसेवक.
- जंगलात अचानकपणे लागलेली आग - वणवा.
- स्वतःच्या मनाप्रमाणे वागणारा - स्वच्छंदी.
- लोकांमध्ये मिळून मिसळून न राहणारा - एकलकोंडा.
- सावकाशपणे घडून येणारा बदल - उत्क्रांती.
- किल्ल्याच्या भोवतालची संरक्षक भिंत - तट.
- वाऱ्याची हळूवार झोत - झुळूक.
- डोंगराच्या आतील पोकळ जागा -गुहा.
- अवकाशात प्रवास करणारे - अंतराळवीर.
- कायम टिकणारे - शाश्वत.
- लिहीण्याची हातोटी / शैली - लेखनशैली.
- देशातील लोकांचे एका विशिष्ट पद्धतीचे आदर्शपुर्ण आचरण - संस्कृती.
- दुसऱ्याचे दुःख पाहून हेलावणारा - कनवाळू.
- जनावरांच्या तळपावलाचा टणक भाग - खूर.
- दोरीवरच्या कसरती करून मनोरंजन करणारा - डोंबारी.
- सपाट जमिनीवरचा किल्ला – भुईकोट.
- निरुपयोगी लोकांचा भरणा - खोगीरभरती.
- मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व - सूत्र.
- हांजी हांजी करणारा - लाचार.
- विषयाला सोडून - अप्रस्तुत.
- आपापसातील कलह- यादवी.
- कोणाकडे डोळे वर करून न बघणारी मनोहर सुंदरी - मुग्धा.
- सदासर्वदा रडत बसणारा बेहिमती मनुष्य - रहतराव.
- नेहमी भांडणासाठी सज्ज असणारा स्वभाव - कजाग.
- तिनही बाजुंनी पाण्याने वेढलेला प्रदेश - द्विपकल्प.
- नऊ रात्रींचा समूह - नवरात्री.
- आपल्यांच देशात तयार होणारे - स्वदेशी.
- ढगांनी आच्छादलेला आकाश - मेघाच्छादित.
- जुन्या रूढी-परंपरा पाळणारे - सनातनी.
- दुसऱ्या देशात तयार होणारे - विदेशी.
- वेगवगळ्या प्रकारचे वेश तयार करणारा - वेशभूषाकार.
- एखाद्याचे वाईट होवो या अर्थाने काढलेले शब्द - शाप.
- शक्य असेल त्याप्रमाणे - यथाशक्ती.
- नवीन मतांचा विचार करुन त्याची कास धरणारा - नवमतवादी.
- स्वर्गातील देवदारातील स्त्रिया - अप्सरा.
- शापापासून मुक्ती मिळण्यासाठी दिलेला पर्याय - उःशाप.
- पडदा दूर करणे -अनावरण.
- चिखलातून उमललेले कमळ - पंकज.
- उगाच रिकामा हिंडून लोकांची चेष्टा करणारा - टवाळखोर.
- राजाची स्तुती करणारा - भाट.
- श्रम व कष्ट न करता आयते खाणारा - ऐतोबा.
- सापांचा खेळ दाखविणारा - गारुडी
- चारही वेदांमध्ये पारंगत असणारा - चतुर्वेदी.
- दोन नद्यांमधील जागा - दुआब
- गावातील लोकांना पाणी मिळण्याची जागा - पाणवठा.
- यात्रेकरूंच्या निवासासाठी बांधण्यात आलेली शाळा - धर्मशाळा.
- भाकरी करण्याची लाकडी परात - काथवट.
- फळांनी बहरलेले उदयान - फलोद्यान.
- फुलांची एकत्रित केलेली रचना - पुष्पगुच्छ.
- तहांच्या अटीचा तर्जुमा - तहनामा.
- कधीही विसरता न येणारे - अविस्मरणीय.
- गावाचे प्रवेशद्वार -वेस
- फक्त फळांचा आहार घेणे -फलाहार
- एकाच ठिकाणी राहण्याची ताकीद देण्यात आलेला - स्थानबध्द.
- राजाचे बसण्याचे आसन - सिंहासन.
- दुसऱ्याला ठार मारण्यासाठी पाठविलेला माणूस - मारेकरी.
- शब्दांना एकाच ठिकाणी संग्रहीत केलेले पुस्तक - शब्दसंग्रह.
- कोणतीही तक्रार न करता - विनातक्रार.
- सूर्याचे दक्षिणेकडे सरकणे - दक्षिणायन.
- एकमेकांच्या चहाडया करणारा - चहाडखोर.
- मातीची भांडी बनविणारा - कुंभार.
- चप्पल व चामडी वस्तु बनविणारा - चांभार.
- ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा - अजिंक्य, अजेय.
- तिन तोंड / मुख असणारा - तीनमुखी
- कोणत्याही प्रकारचा व्यापार करणारे- व्यापारी
- सर्वात उंच -सर्वोच्च
- मोठे पोट / उदर असणारा -लंबोदार
- ज्याचा कधीही वीट येत नाही असा - अवीट
- अंगचे राखूण काम करणारा - अंगचोर
- प्रश्न विचारताच त्याचे एका क्षणात योग्य उत्तर देणारा - हजरजवाबी.
- पायात चप्पल / पादत्राणे न घालता चालणे - अनवाणी.
- जिचा पती जिवंत आहे अशी स्त्री - सवाष्ण/सधवा
- झाडांच्या सालीपासून तयार केलेले वस्त्र - वल्कल
- पाहण्यालायक अनेक वस्तूंना एकत्रित मांडलेली जागा - प्रदर्शन
- अनेक लेखांचे, प्रकाशनांचे संपादन करणारा – संपादक.
- अनेक प्रकारचे लेख, मासिक, पुस्तके प्रकाशित करणारा - प्रकाशक.
- परिक्षण करणारा - परीक्षक.
- सुखाने जीवन व्यतीत करणारा - सुखवस्तू
- गावाच्या कामकाजाची जागा - चावडी.
- घोडे बांधण्याची जागा - पागा
- अस्वलांचा खेळा दाखविणारा - दरवेशी
- पशु-पक्ष्यांना आश्रय देण्यात आलेली जागा - अभयारण्य
- वृध्दांना आश्रय देण्यात येतो ती संस्था - वृद्धाश्रम
- ज्यांना कुणीही वाली नाही अशा मुलांचा सांभाळ करणारी संस्था - अनाथाश्रम
- दुसऱ्याच्या ताब्यात असलेला - अंकित
- सूचना न देता येणारा पाहुणा - आगंतुक
- स्वतःशीच केलेले भाषण - स्वगत
- बारा लोकांचा हस्तक्षेप असलेला कारभार - बारभाई कारभार
- दोन वेळा जन्मलेला - द्विज.
- पहाटेचा सुखद प्रहर - रामप्रहर.
- शेतात पाणी अडविण्यासाठी बांधण्यात आलेला उंचवटा - बंधारा.
- एकाच गोष्टीचा एकसारखा उच्चार करणे - जयघोष.
- एकमेकांवर अवलंबून असणारे - परस्परावलंबी.
- विशिष्ट स्थळापासून पाच कोसांचा प्रदेश - पंचकोशी.
- आपल्याच मताप्रमाणे चालणारा - हटवादी.
- समाजातील इतरांना विनाकारण त्रास देणारे लोक - समाजकंटक.
- दिवसाला भिणारे - दिवाभीत.
- त्या वेळचा - तत्कालीन
- गडाचा किंवा किल्ल्याचे संरक्षण करणारा - गडकरी.
- मोठयाने केलेले पाठांतर - घोकंपटटी.
- म्हातारपणामुळे बुध्दीला आलेला पोरकटपणा/ चंचलपणा - म्हातारचाळ.
- देवापुढे सतत तेवत असणारा दिवा - नंदादीप.
- देवापुढे रोज ठेवण्यात येणारा ताट - नैवैद्य.
- मंदिरातील घंटा वाजवितानां होणारा नाद - घंटानाद.
- अग्निची पुजा करणारा - अग्निपूजक.
- साहित्य, संगीत, कला आणि शास्त्रे यांना प्रोत्साहन देणारी संस्था - अकादमी.
- कर्तव्याकडे पाठ फिरविणारा - कर्तव्यपराड, मुख.
- ज्याला कोणाचीही कसलीही भिती नाही असा - अकुतोभय.
- कष्टाने साध्य झालेले - कष्टसाध्य.
- स्वत्वाचा अभिमान नसलेला - स्वाभिमानशून्य.
- गाण्यातील तान - लकेर.
- बोधपर वचन - सुभाषित.
- देशासाठी प्राणार्पण केलेल्या व्यक्तींची आठवण व्हावी म्हणून उभारलेली गोष्ट - स्मारक.
- युध्दाच्यावेळी चक्राकार केलेली रचना - चक्रव्यूह.
- दुसरा मार्ग नसलेला - अनन्यगतिक
- पतिनिधनानंतर स्त्रीने केलेले आत्मदहन - सहगमन.
- वर्णन करण्याची हातोटी किंवा शैली - वर्णनशैली.
- धर्मार्थ जेवण मिळण्याची सोय - अन्नछत्र.
- नावेतून करण्याची जलक्रिडा - नौकाविहार.
- कबुतराप्रमाणे अन्नसंचय करुन अल्पकाळात त्याचा उपयोग करण्याची वृत्ती - कपोत वृत्ती.
- मुळातच सुंदर असलेला - निसर्गसुंदर.
- ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर - प्रक्षिप्त.
- आकाशात गमन करणारा - खग.
- अतिशय लवकर राग येणारा - शीघ्रकोपी.
- चांगला विचार - सुविचार.
- उत्तम भाषन करण्याची कला - वर्वृत्वकला.
- कोणत्याही पक्षांची बाजू न घेता योग्य तो न्याय देणारा - निःपक्षपाती.
- कार्य करण्यास सक्षम असणारा - कार्यक्षम
- एकला उद्देशून दुसर्याूला बोलणे - अन्योक्ती
- कोणत्याही संस्थेला किंवा व्यक्तीला शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत - अनुदान
- अभिषेक न झलेला - अनभिषिक्त
- अंत:करणाला पाझर फोडणारी - दृदयद्रावक
- इंद्रियांना आकलन न होणारे - अतींद्रिय
- मागील कालखंडाचा आढावा घेणे - सिंहावलोकन
- एखादी गोष्ट लवकर आकलन होणारा - तैलबुद्धी
- क्षमा करण्यास योग्य - क्षंतव्या
- आपापसातील कलह - यादवी
- दुधाचा समुद्र - क्षीराब्धी, क्षीरसागर
- प्रथम केलेली पूजा - अग्रपूजा
- सामुहिकपणे केलेले गायन - वृंदगायन
- नारळाच्या झाडाची पाने - झावळ्या.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा