एकाच शब्दाचे भिन्न अर्थ

एका शब्दाचे जसे अनेक समान अर्थ असतात; तसेच शब्दाचे परिस्थितीनुसार वेगवेगळे अर्थ निघू शकतात.

1) अंग – शरीर, कौशल्य, बाजू

2) अनंत - अमर्याद, परमेश्वर

3) अर्थ - पैसा, आशय, हेतू

4) अक्षर – पूर्ण उच्चाराचा वर्ण, अविनाशी

5) अनंत - अमर्याद, विष्णू, आकाश, खूप, पुष्कळ, फुलाचे किंवा माणसाचे नाव

6) ओढा - मनाचा कल, पाण्याचा प्रवाह, आकर्षण

7) अंक - आकडा, मांडी, नाटकाचा एक भाग, नियतकालिकाची एक प्रत

8) अंबर - आकाश, वस्त्र, खजिना, मुलाचे नाव, खिळा उपटण्याचा चिमटा

9) अब्ज - कमळ, शंभर कोटींची संख्या

10) आड - विहीर, एका बाजूला

11) अढी - पिकलेल्या आंब्याचा ढीग, पायावर पाय टाकून बसणे.

12) अभंग - अखंड, न फुटलेला, मराठीतील एक काव्यप्रकार

13) अंतर - हृदय, वियोग, मन, फरक, भेदभाव

14) उत्तर - दिशेचे नाव, प्रश्नाचे उत्तर

15) अवकाश - सवड, रिकामा वेळ, अवधी, आकाश

16) आस - इच्छा, उत्कंठा, गाडीच्या चाकाचा कणा

17) आकडा - संख्या, अंक, बाकदार, नाणी, चिंचेचे बाकदार टोक

18) ऋण - वजाबाकीचे चिन्ह, कर्ज, उपकार

19) कळ - गुप्त किल्ली, भांडण लावणे, दुःख, खुबी

20) काळ - वेळ, यम, मृत्यू

21) कर - हात, किरण, सरकारी सारा, संक्रांतीचा दुसरा दिवस, एक क्रियापद

22) कर्ण - कान, कुंतीपुत्र, काटकोन चौकोनातील काटकोनासमोरील बाजू

23) कर्क - खेकडा, एक रास, एक असाध्य रोग

24) कोळी - एक कीटक, मासे पकडणारा

25) कडी - दाराला लावायची साखळी, मात

26) कोरडा - सुकलेला, चाबकाचा फटकारा, दुष्काळाचा

27) कसर - बारीक ताप, उणीव, वाळवी, नफा

28) कढ - उकळी, फेस, गहिवर (उमाळा)

29) कट - कारस्थान, एकमत, पुरणाचे पाणी

30) कासार - बांगड्या भरणारा, तलाव

31) खत - वनस्पतींचे अन्न, करार, पत्र

32) खल - चर्चा, दुष्ट, कुटण्याचे साधन

33) खोड – झाडाचा एक अवयव, वाईट सवय

34) गार - थंड, तांदळातील बारीक पांढरा खडा, आकाशातून पडणारा बर्फाचा खडा

35) ग्रह - आकाशातील गोल, समज, स्वीकार

36) गोळा - लोणी / चिखल / कणकेचा गोळा, गोल वस्तू, जमाव, भीतीचा गोळा

37) गोम - अनेक पायांचा एक प्राणी, वैगुण्य, मर्म

38) गज - हत्ती, लोखंडी कांब / खांब, लांबी मोजण्याचे एक परिमाण

39) घाट - डोंगरातील वळणावळणाचा रस्ता, नदीच्या पायऱ्या, आकार

40) घन - मेघ, एकाच संख्येचा तीन वेळा गुणाकार, पदार्थाची एक अवस्था, दाट, ठोकळा

41) चरण - पाय, गाण्याची ओळ

42) चिरंजीव - मुलगा, कायम टिकणारा, दीर्घायुषी

44) चपला - वहाणा, वीज

45) चाळ - घरांची रांग, पैंजण, चाळणे, खोडी

46) चमक - वेदना, तेज

47) चाल - गती, हल्ला, पद्धती

48) जलद- ढग, लवकर

49) जीवन - पाणी, आयुष्य, मुलाचे नाव

50) टकळी - सूत कातण्याचे साधन, वटवट, ध्यास

51) टाच - पायाचा भाग, जप्ती

52) डाव - एक प्रकारची खेळी, कारस्थान, खेळाचा डाव

53) तट - किनारा, किल्ल्याभोवतीची भिंत

54) तीर - नदीचा काठ, किनारा, बाण

55) तार - धातूचा तंतू, धुंदी, तारायंत्राचा संदेश

56) दंड - काठी, शिक्षा, बाहू

57) द्वीज - ब्राह्मण, पक्षी, दात

58) दल - पाकळी, सैन्य विभाग, पान, पथक, तुकडी

59) दाम - पैसा, मूल्य

60) दम - श्वास, धाप, धीर

61) दशमी - एक तिथी, दुधातील भाकरी

62) थाप - बाता मारणे, तबल्यावरची थाप

63) धड - न फाटलेला, डोक्याशिवाय शरीराचा भाग

64) ध्यान - चिंतन, भोळसट व्यक्ती, स्मरण

65) नाद - आवाज, छंद

66) नाव - होडी, वस्तू/प्राण्याचे नाव

67) नजर - नजराणा, दृष्टी

68) निमिष - मुलाचे नाव, क्षण

69) पय - पाणी, दूध, अमृत

70) पर - पंख, परंतु, परका

71) पाट - एक आसन (बसायचा पाट), पाण्याचा लहान प्रवाह

72) पाव - चौथा भाग, खाण्याचा पदार्थ, प्रसन्न होणे.

73) पार - पलीकडे, झाडाभोवतालचा ओटा, आरपार

74) पूर – शहर, पाण्याचा लोंढा

75) पाठ - धडा, पाठांतर, शरीराचा एक अवयव

76) पत्र - पान, पोस्टातील पत्र

77) पालक - पालन करणारा, एक पालेभाजी

78) पण - परंतु, प्रतिज्ञा

79) पाल - एक प्राणी, आदिवासींचे घर

80) पक्ष - पंख, पंधरवडा, श्राद्ध, राजकीय संघटना

81) पात्र - भांडे, नदीची रुंदी, भूमिका, लायक, योग्य

82) पोत - स्त्रियांच्या गळ्यातील काळ्या मण्यांची माळ, जमिनीची पत

83) पट - आकाश, वस्त्र, बुद्धिबळाचा पट, आवृत्तीदर्शक शब्द

84) बोट - पाण्यातील वाहन, हाताचे किंवा पायाचे बोट

85) भाव - किंमत, भक्ती, भावना

86) भेट - नजराणा, दोन व्यक्तींची भेट

87) माया - मुलीचे नाव, धन

88) माळ - मोकळी जागा, फुलांचा / मण्यांचा हार

89) मान - शरीराचा भाग, मोठेपणा

90) मकर - सुसर, एक रास

91) मूळ - झाडाचा अवयव, उगम, एक नक्षत्र

92) मठ - धार्मिक शिक्षणसंस्था, एक धान्य

93) मित्र - दोस्त, सूर्य

94) मात्रा - इलाज, अक्षराच्या डोक्यावरीलति रकी रेष, स्वरांचे कालमापन

95) यात्रा - जत्रा, धार्मिक प्रवास

96) लहर - लाट, हुक्की

97) लाख - लक्ष, एक पदार्थ

98) वाणी - व्यापारी, बोलणे, भाषा, सरस्वती

99) वर - पती, आशीर्वाद, वरची बाजू, श्रेष्ठ

100) वाढ - पदार्थ वाढणे, एखाद्या गोष्टीत होणारी वाढ

101) वार - दिवस, घाव

102) वात - वारा, दिव्याची वात, एक विकार

103) वजन - भार, महत्त्व, प्रतिष्ठा

104) वल्ली - वेल, स्वच्छंदी मनुष्य

105) वारी - मोठी दगदग होणे, दमणे.

106) वाली - रक्षणकर्ता, रामायणातील एक वानर

107) विभूती - भस्म, महापुरुष

108) सुमन - फूल, मुलीचे नाव, चांगले मन

109) सर - माळ, पावसाची सर, जिंकणे, शिक्षक

110) सूत - धागा, संबंध, सारथी, स्नेहभाव

111) राई - दाट झाडी, मोहरी

Share on Google Plus

About Vikas Dev

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.