विरुद्धार्थी शब्द

मराठी व्याकरणात विरुद्धर्थी शब्दांला विशेष महत्त्व आहे. ज्या शब्दांचे अर्थ एकमेकांचे अर्थ हे परस्पर भिन्न किंवा विरुद्ध असतात ते शब्द म्हणजे ‘विरुद्धर्थी शब्द’ होय. स्पर्धा परीक्षेमध्ये समानार्थी शब्द व विरुद्धर्थी शब्द यांच्यावर आधारित विविध प्रशंनांचा समावेश केलेला असतो. विविध स्पर्धा परीक्षेत या विभागांवर हमखास २ ते ३ प्रश्नांचा समवेश असतो. ह्या परीक्षा पास करण्याच्या दृष्टीकोणातून ह्या विभागांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने खाली ७०० च्या वर विरुद्धर्थी शब्द दिलेले आहेत. तसेच विरुद्धर्थी शब्द पाठ व्हावेत/ लक्षात रहावेत म्हणून विविध नियम दिले आहेत. या नियमांच्या आधारे या शब्दांचा अभ्यास करणे सोपे होते.
विरुद्धर्थी शब्द (opposite words of Marathi)
विरुद्धर्थी शब्द


नियम 1:- शब्दाला ‘अ’ लावून किंवा शब्द समुहाच्या जागी ‘अ’ घेवून विरुद्धर्थी शब्द बनवता येते.

अ.क्र. विरुद्धर्थी शब्द
कल्याण x अकल्याण
कुलीन x अकुलीन
कुशल x अकुशल
क्षम्य x अक्षम्य
क्षय x अक्षय
चल x अचल
चूक x अचूक
ज्ञात x अज्ञात
ज्ञान x अज्ञान
१० ज्ञानी x अज्ञानी
११ तुलनीय x अतुलनीय
१२ तृप्त x अतृप्त
१३ दृश्य x अदृश्य
१४ धर्म x अधर्म
१५ नित्य x अनित्य
१६ नियंत्रित x अनियंत्रित
१७ नियमित x अनियमित
१८ निवासी x अनिवासी
१९ निश्चित x अनिश्चित
२० नीती x अनीती
२१ न्याय x अन्याय
२२ पथ्य x अपथ्य
२३ पराजित × अपराजित
२४ पवित्र × अपवित्र
२५ पात्र x अपात्र
२६ पारदर्शक × अपारदर्शक
२७ पूर्ण x अपूर्ण
२८ पूर्णांक × अपूर्णांक
२९ प्रकट × अप्रकट
३० प्रगत x अप्रगत
३१ प्रत्यक्ष × अप्रत्यक्ष
३२ प्रमाण × अप्रमाण
३३ प्रशस्त x अप्रशस्त
३४ प्रसन्न × अप्रसन्न
३५ प्रसिद्ध x अप्रसिद्ध
३६ प्रामाणिक x अप्रामाणिक
३७ प्रिय x अप्रिय
३८ बोलका x अबोल
३९ भय x अभय
४० भारतीय x अभारतीय
४१ मंगल x अमंगल
४२ मर्याद x अमर्याद
४३ मर्यादित × अमर्यादित
४४ मान्य x अमान्य
४५ मूर्त x अमूर्त
४६ यशस्वी x अयशस्वी
४७ याचित × अयाचित
४८ योग्य x अयोग्य
४९ रसिक × अरसिक
५० रुंद x अरुंद
५१ रुची x अरुची
५२ लिखित x अलिखित
५३ लौकिक x अलौकिक
५४ वास्तव x अवास्तव
५५ विकारी × अविकारी
५६ विचार x अविचार
५७ विचारी x अविचारी
५८ विभक्त × अविभक्त
५९ विवाहित × अविवाहित
६० विवेकी × अविवेकी
६१ विश्वास × अविश्वास
६२ विश्वासनिय × अविश्वासनिय
६३ विस्मरणीय × अविस्मरणीय
६४ वैध × अवैध
६५ व्यंग x अव्यंग
६६ व्यवस्थित × अव्यवस्थित
६७ व्यवहार x अव्यवहार
६८ शक्य × अशक्य
६९ शांत × अशांत
७० शाश्वत × अशाश्वत,क्षणभंगूर
७१ शिक्षित x अशिक्षित
७२ शुद्ध × अशुद्ध
७३ शुभ × अशुभ
७४ श्राव्य × अश्राव्य
७५ श्रुत × अश्रुत
७६ संघटित x असंघटित
७७ संतुष्ट × असंतुष्ट
७८ संतोष × असंतोष
७९ संभव x असंभव
८० सक्षम × अक्षम
८१ सत्य × असत्य
८२ सदिश x अदिश
८३ सनाथ x अनाथ
८४ सपुष्प x अपुष्प
८५ सफल × असफल
८६ सभ्य × असभ्य
८७ समंजस × असमंजस
८८ समर्थ × असमर्थ
८९ समाधान x असमाधान
९० समान x असमान
९१ सशक्त x अशक्त
९२ सहकार x असहकार
९३ साधारण x असाधारण
९४ साध्य x असाध्य
९५ सामान्य x असामान्य
९६ सुरक्षित x असुरक्षित
९७ सुजाण x अजाण
९८ सुशिक्षित x अशिक्षित
९९ सुसह्य x असह्य
१०० सूर x असूर
१०१ स्थिर x अस्थिर
१०२ स्पष्ट x अस्पष्ट
१०३ स्पृश्य x अस्पृश्य
१०४ स्वच्छ x अस्वच्छ
१०५ स्वस्थ x अस्वस्थ
१०६ हिंसक x अहिंसक
१०७ हिंसा x अहिंसा
१०८ हित x अहित
१०९ चेत x अचेत
११० परिमेय x अपरिमेय


नियम २:- शब्दाला ‘बे’ लावून किंवा शब्द समुहाच्या जागी ‘बे’ घेवून विरुद्धर्थी शब्द बनवता येते.
अ.क्र. विरुद्धर्थी शब्द
अब्रू x बेअब्रू
इमानी x बेइमानी
कायदेशीर x बेकायदेशीर
चव x बेचव
जबाबदार x बेजबाबदार
ताल x बेताल
भान x बेभान
वारस x बेवारस
शिस्त x बेशिस्त
१० सावध x बेसावध
११ सुरेल x बेसूर
१२ हिशेबी x बेहिशेबी

नियम ३:- शब्दाला ‘कु’ लावून किंवा शब्द समुहाच्या जागी ‘कु’ घेवून विरुद्धर्थी शब्द बनवता येते.
अ.क्र. विरुद्धर्थी शब्द
शंका × कुशंका
सत्कर्म × कुकर्म
सन्मार्ग × कुमार्ग
सुप्रसिद्ध x कुप्रसिद्ध
सुभाषित x कुभाषित
सुरूप x कुरूप
सुलक्षणी x कुलक्षणी,अवलक्षणी
सुविख्यात x कुविख्यात
सुविचार x कुविचार
नियम ४:- शब्दाला ‘दुर्’ लावून किंवा शब्द समुहाच्या जागी ‘दुर्’ घेवून विरुद्धर्थी शब्द बनवता येते.
अ.क्र. विरुद्धर्थी शब्द
अभिमान × दुराभिमान
भाग्य x दुर्भाग्य
भूषणx दूषण
लक्ष x दुर्लक्ष
लौकिक × दुलौकीक
सज्जन x दुर्जन
सदाचार x दुराचार
सदाचारीx दुराचारी
सद्गुणी x दुर्गुणी
१० सुकाळ x दुष्काळ
११ सुगंध x दुर्गंध
१२ सुगम x दुर्गम
१३ सुदैव x दुर्दैव
१४ सुदैवी x दुर्दैवी
१५ सुबोध × दुर्बोध
१६ सुर्कीर्ती x दुष्कीर्ती
१७ सुलभ × दुर्लभ
१८ सूचिन्ह × दुश्चिन्ह
१९ सुष्ट × दुष्ट

नियम ५:- शब्दाला ‘अन्’ लावून किंवा शब्दातील एकदा शब्द किंवा शब्द समुहा एवजी ‘अन्’ लावून विरुद्धर्थी शब्द बनवता येते.
अ.क्र. विरुद्धर्थी शब्द
अधिकृत x अनधिकृत
अपेक्षित x अनपेक्षित
अर्थ x अनर्थ
अवधान × अनावधान
आकर्षक x अनाकर्षक
आकलनीय x अनाकलनीय
आदर x अनादर
आदर्श x अनादर्श
आदी × अनादी
१० आस्था x अनास्था
११ इच्छा x अनिच्छा
१२ इष्ट x अनिष्ट
१३ अतिवृष्टी x अनावृष्टी
१४ उचित x अनुचित
१५ उत्तीर्ण x अनुत्तीर्ण
१६ उत्साही x निरुत्साही, अनुत्साही
१७ उदार × अनुदार
१८ उदार × कंजूस, अनुदार
१९ उपस्थित x अनुपस्थित
२० एक × अनेक
२१ एकदा x अनेकदा
२२ ऐच्छिक x अनैच्छिक
२३ ओळख x अनोळख
२४ ओळखी x अनोळखी
२५ औरस × अनौरस

नियम ६:- शब्दाला ‘अव’ लावून किंवा शब्द समुहाच्या जागी ‘अव’ घेवून विरुद्धर्थी शब्द बनवता येते.
अ.क्र. विरुद्धर्थी शब्द
आज्ञा x अवज्ञा
आरोह x अवरोह
आरोहण x अवरोहण
उन्नत × अवनत
उन्नतीx अवनती
कृपा x अवकृपा
गुण x अवगुण, दोष
गुणी x अवगुणी

नियम ७:- शब्दाला ‘निर्’ अथवा ‘नि’ लावून किंवा शब्द समुहाच्या जागी ‘निर्’ अथवा ‘नि’ घेवून विरुद्धर्थी शब्द बनवता येते.
अ.क्र. विरुद्धर्थी शब्द
अपराधी x निरपराधी
आयात x निर्यात
आशा x निराशा
उत्कृष्ट x निकृष्ट
उपयोग x निरुपयोग
उपयोगी x निरुपयोगी
उपाय × निरुपाय
दोषी x निर्दोषी
रोगी x निरोगी
१० लोभी x निर्लोभी
११ विवाद × निर्विवाद
१२ वेध × निर्वेध
१३ व्यसनी x निर्व्यसनी
१४ श्वास x निःश्वास
१५ सकाम × निकाम
१६ सगुण x निर्गुण
१७ सजीव x निर्जीव
१८ सतेज x निस्तेज
१९ सदय x निर्दय
२० सधन x निर्धन
२१ सरस x नीरस
२२ सशस्त्र x नि:शस्त्र
२३ साकार x निराकार
२४ साक्षर x निराक्षर
२५ सार्थक x निरर्थक
२६ सुरस × नीरस
२७ स्वार्थी x निःस्वार्थी

नियम ८:- शब्दाला ‘पर’ लावून किंवा शब्द समुहाच्या जागी ‘पर’ घेवून विरुद्धर्थी शब्द बनवता येते.
अ.क्र. विरुद्धर्थी शब्द
इहलोक × परलोक
जय, विजय x पराजय, पराभव
स्वकीय x परकीय
स्वतंत्र x परतंत्र
स्वदेश x परदेश
स्वदेशी x परदेशी
स्वातंत्र्य x पारतंत्र्य
स्वाधीन x पराधीन, परस्वाधीन
स्वार्थ × परमार्थ

नियम ९:- शब्दाला ‘अप’ लावून किंवा शब्द समुहाच्या जागी ‘अप’ घेवून विरुद्धर्थी शब्द बनवता येते.
अ.क्र. विरुद्धर्थी शब्द
उत्कर्ष × अपकर्ष
उपकार x अपकार
कीर्ती x अपकीर्ती
बहुमान x अपमान
मान x अपमान
यश x अपयश
शकून x अपशकून

नियम १०:- काही शब्दाच्या मागील अथवा पुढील शब्द बदलून विरुद्धर्थी शब्द बनबता येतात.
अ.क्र. विरुद्धर्थी शब्द
अनुकूल x प्रतिकूल
अपेक्षाभंग x अपेक्षापूर्ती
अर्थ × अर्थहीन
आवक × जावक
आवडते x नावडते
आसक्ती × विरक्ती
आस्तिक x नास्तिक
इकडे x तिकडे
इथली x तिथली
१० इलाज x नाईलाज
११ उलट x सुलट
१२ उलटा x सुलटा
१३ एकमत × दुमत
१४ ऐलतीर × पैलतीर
१५ ओवळा × सोहळा
१६ कर्णमधुर x कर्णकटू
१७ गमन x आगमन
१८ चिरंजीवी x अल्पजीवी
१९ जेवढा x तेवढा
२० तारक x मारक
२१ दीर्घायुषी x अल्पायुषी
२२ देशभक्त x देशद्रोही
२३ देशी x विदेशी, परदेशी
२४ निष्काम x सकाम
२५ प्रगती x अधोगती
२६ प्रतिकार x सहकार
२७ प्राचीन × अर्वाचीन
२८ मंजूर x नामंजूर
२९ रनशूर × रनभीरु
३० रसाळ x रसहीन
३१ राजमार्ग × आडमार्ग
३२राष्ट्रीय × अंतराष्ट्रीय
३३ रुकार × नकार
३४ वंद्य × निंद्य
३५ वापर x गैरवापर
३६ विसंवाद x सुसंवाद
३७ शाकाहार x मांसाहार
३८ श्रेष्ठ x कनिष्ठ
३९ सकस x निकस
४० सधवा × विधवा
४१ सफल x विफल
४२ समजूत x गैरसमजूत
४३ समता x विषमता
४४ साधक x बाधक
४५ सूर्योदय x सूर्यास्त
४६ सोय x गैरसोय
४७ स्मृती × विस्मृती

नियम ११:- अनियमित विरुद्धर्थी शब्द.
अ.क्र. विरुद्धर्थी शब्द
अंकूचन × प्रसरण
अंतरंग × बहिरंग
अंथरूण × पांघरून
अकलवन्त × अकलशून्य,अकलमंद
अग्रज × अनुज
अचूक x चुकीचे
अजर × जराग्रस्त
अजस्त्र × चिमुकले
अटक × सुटका
१० अति ×अल्प
११ अथ ×इति
१२ अधिक × उणे
१३ अनुरूप × विजोड
१४ अपेक्षाभंग × अपेक्षापूर्ती
१५ अबोल × वाचाल
१६ अमूल्य × कवडीमोल
१७ अमृत x विष, जहर, हलाहल
१८ अर्थपूर्ण × निरर्थक
१९ अलीकडे × पलीकडे
२० अल्लड × पोक्त
२१ अवखळ × गंभीर
२२ असणे × नसणे
२३ अस्सल × नक्कल
२४ अहंकार × विनम्रता
२५ आकाश x पाताळ
२६ आगमन × निर्गमन
२७ आघाडी × पिछाडी
२८ आज्ञा x अवज्ञा, विनंती
२९ आठवण × विस्मरण
३० आठवणे × विसरणे
३१ आडवे × उभे
३२ आत x बाहेर
३३ आता × नंतर, पूर्वी
३४ आतुरता × उदासिनता
३५ आदि × अंत
३६ आधी × नंतर
३७ आधुनिक × सनातनी
३८ आनंद x दुःख
३९ आपुलकी × परकेपणा
४० आमंत्रित × आंगतुक
४१ आय × व्यय
४२ आयात × निर्यात
४३ आरंभ, सुरुवात x अंत, अखेर, शेवट
४४ आराम × कष्ट
४५ आला × गेला
४६ आवक × जावक
४७ आशीर्वाद × शाप
४८ इप्सित × अवांच्छित
४९ उंच × ठेंगणा, बुटका,सखल
५० उगवणे × मावळणे
५१ उगवती × मावळती
५२ उघड × गुप्त, बंद
५३ उघडा x बंद
५४ उच्च × नीच
५५ उजेड × काळोख, अंधार
५६ उताणा × पालथा
५७ उतार × चढाव
५८ उत्कर्ष × अपकर्ष, अधोगती
५९ उत्तम × क्षुद्र
६० उत्तेजन × खच्चीकरण
६१ उत्साही × निराश, हिरमुसलेला
६२ उथळ x खोल
६३ उदंड × कमी
६४ उदय × अस्त
६५ उदार × कंजूष
६६ उद्घाटन × समारोप
६७ उद्योग x आळस
६८ उद्योगी x आळशी
६९ उधळ्या × कंजूष
७० उपदेश × बदसल्ला
७१ उभा × आडवा
७२ उमेद × मरगळ
७३ उल्हसित × उदासिनता
७४ उष्ण, गरम × थंड,गार, शीतल
७५ ऊन × सावली
७६ एकत्र x विभक्त
७७ एकी x बेकी, दुही
७८ ऐतखाऊ x कष्टाळू
७९ ऐतदार × केविलवाणा
८० ओला × कोरडा, सुका
८१ औत्सुक्य × औदासीन्य
८२ कठीण x मऊ
८३ कमाल x किमान
८४ कळस × पाया, पायरी
८५ कष्टाळू × कामचोर
८६ काटकसर x उधळपट्टी
८७ काटकसरी × उधळ्या
८८ कालिक × कालातीत
८९ कीव × राग
९० कृतज्ञ × कृतघ्न
९१ कृत्रिम x नैसर्गिक, स्वाभाविक
९२ कृश × स्थूल
९३ कृष्ण × धवल
९४ कोवळा ×कडक,निबर
९५ कौतुक × निंदा
९६ क्षमा × शिक्षा
९७ क्षेम × धोका
९८ खंबीर × डळमळीत
९९ खरे x खोटे
१०० खरेदी × विक्री
१०१ खात्री × शंका
१०२ खादाड × मितहरी
१०३ खूप × कमी
१०४ खोल × उथळ
१०५ गंभीर × अवखळ
१०६ गच्च × सैल,विरळ
१०७ गतकाल, भूतकाळ × भविष्यकाळ
१०८ गती × अधोगती,परागती
१०९ गद्य × पद्य
११० गर्विष्ठ x निगर्वी, विनम्र
१११ गारवा × उष्मा
११२ गुण × दोष
११३ गुणगान × निंदा
११४ गुप्त x उघड
११५ गुरु × शिष्य
११६ गुळगुळीत x खडबडीत, खरखरीत, ओबडधोबड
११७ गोड x कडू, अगोड
११८ ग्रामीण × शहरी
११९ ग्राहक × विक्रेता
१२० ग्राह्य × त्याज्य
१२१ घट्ट x सैल
१२२ घरंदाज × कुलटा
१२३ घाऊक × किरकोळ
१२४ चढ × उतार
१२५ चढण x उतरण
१२६ चढणे × उतरणे
१२७ चढाई × माघार
१२८ चपळ x मंद, सुस्त
१२९ चवदार x बेचव, सपक
१३० चांगला x वाईट
१३१ चिमुकला × थोरला, मोठा, भव्य
१३२ चिरंजीव × अल्पजीवी
१३३ चेतन × जड
१३४ छोठा × मोठा
१३५ जगणे × मरणे
१३६ जड × हलके, चेतन
१३७ जनता × नेता
१३८ जन्म × मृत्यू
१३९ जमा × खर्च
१४० जयंती × पुण्यतिथी
१४१ जर × तर
१४२ जलद × सावकाश, हळू
१४३ जवळ × दूर
१४४ जाग × झोप, निद्रा
१४५ जागणे × झोपणे
१४६ जागरूक × निष्काळजी
१४७ जागृत x निद्रिस्त
१४८ जाड × रोड
१४९ जाणता × अजाण,अडाणी
१५० जास्त × कमी
१५१ जिवंत x मृत
१५२ जीत × हार
१५३ जीवन x मृत्यू
१५४ जेता × जित
१५५ जेवढा × तेवढा
१५६ जोश × कंटाळा
१५७ ज्येष्ठ x कनिष्ठ
१५८ झकास × निकृष्ट
१५९ टिकाऊ × कमकुवत, ठिसूळ
१६० ठळक × पुसट
१६१ डावा × उजवा
१६२ डोळस x आंधळा अंध
१६३ डौलदार x बेढब, बेडौल, बेढब
१६४ तजेलदार × कोमेजलेले
१६५ तन्मय × द्विधा
१६६ तरुण × म्हातारा, वृद्ध
१६७ तहान × भूक
१६८ ताजा × शिळा
१६९ ताजे × शिळे
१७० तीक्ष्णx बोथड
१७१ तेजस्वी x निस्तेज,तेजहीन
१७२ तेजी × मंदी
१७३ थंड × गरम
१७४ थंडी × उष्मा, गरमी
१७५ थोडे × जास्त
१७६ थोर × लहान
१७७ थोरला × धाकटा
१७८ दया × राग
१७९ दयाळू x निर्दय, जुलमी, क्रूर
१८० दर्जेदार x हीन
१८१ दाट x विरळ, तुरळक
१८२ दाता × याचक
१८३ दिन × रात
१८४ दिवस x रात्र
१८५ दीप्ती × अंधःकार
१८६ दीर्घ x -हस्व
१८७ दुभती × भाकड
१८८ दुरित × सज्जन
१८९ दुरुस्ती x बिघात
१९० देव × दानव, दैत्य, राक्षस
१९१ देवाण    × घेवाण
१९२ दैववाद × प्रयत्नवाद
१९३ धडधकड × कमजोर
१९४ धनवंत × गरीब, निर्धन
१९५ धाडस × भित्रेपणा
१९६ धीट × भित्रा
१९७ धुरीण × अनुयायी
१९८ नफा × तोटा
१९९ नम्र × उद्धट
२०० नम्रता × उद्धटपणा
२०१ नम्रता × औधत्य
२०२ नरम × कडक
२०३ नवा × जुना
२०४ नशीबवान × कमनशिबी
२०५ नाजुक × मजबूत, निगरगठ्ठ, राठ
२०६ नाजूक × राकट
२०७ नि:   शस्त्र × शस्त्रधारी
२०८ निमंत्रित × आगंतुक
२०९ निर्भय × भयभीत
२१० निर्मल × मळका, मळकट
२११ नीटनेटका × गबाळयंत्री, गबळ्या
२१२ नेहमी × क्वचित
२१३ नैसर्गिक × कृत्रिम
२१४ न्यूनता × विपुलता
२१५ पक्का × कच्चा
२१६ परवानगी × बंदी
२१७ पराक्रमी × भित्रा
२१८ पहिला x शेवटचा
२१९ पांढरा, गोरा × काळा
२२० पाप × पुण्य
२२१ पापी x पुण्यवान
२२२ पायथा x शिखर
२२३ पुढची x मागची
२२४ पुढारी, नेता × अनुयायी, कार्यकर्ता
२२५ पुष्कळ x थोडे
२२६ पूर्ण × अर्धवट
२२७ पूर्व x पश्चिम
२२८ पोर्णिमा × अमावस्या
२२९ पोलिस × चोर
२३० पौर्वात्य × पाश्चात्य, पाश्चिमात्य
२३१ प्रकाश,उजेड × तम,तिमिर,काळोख,अंधकार
२३२ प्रगती, उन्नती    × अधोगती
२३३ प्रचंड × चिमुकले
२३४ प्रशंसा × कुचाळी
२३५ प्रश्न × उत्तर
२३६ प्रसन्न x खिन्न, उदास, उद्विग्न
२३७ प्रामाणिकपणा × लबाडी
२३८ प्रारंभ x अखेर, अंत
२३९ प्रेम × द्वेष
२४० फलदाई × कुचकामी
२४१ फायदा × नुकसान, तोटा
२४२ फार × कमी
२४३ फिकट x गडद, भडक
२४४ फुकट x विकत
२४५ फुलणे x कोमेजणे
२४६ बंधन × मुक्तता
२४७ बरे × वाईट
२४८ बरोबर x चूक
२४९ बलवान x दुर्बल
२५० बलाढ्य × कमजोर
२५१ बसणे × उठणे
२५२ बुद्धिमान x ढ, निर्बुद्ध, मठ्ठ
२५३ बोथड x धारदार
२५४ बोलका x मुका
२५५ भक्कम x लेचापेचा, कमकुवत
२५६ भरती × ओहोटी
२५७ भरभर x सावकाश
२५८ भरभराट × ऱ्हास
२५९ भरभराट x   -हास
२६० भले × बुरे
२६१ भव्य x चिमुकले
२६२ भांडण x सलोखा
२६३ भाग्यवान × अभागी ,दुर्भागी
२६४ भूक x तहान
२६५ भेसळ x निर्भळ
२६६ भोग × त्याग
२६७ भोळा x धूर्त, कावेबाज, लबाड
२६८ भोळा x लबाड
२६९ मंजुळ x कर्कश, भसाड
२७० मंद x प्रखर
२७१ मऊ, मृदू × ठणक, कठीण, कठोर
२७२ मधुर x कडवट
२७३ मनोरंजनक × कंटाळवाणे
२७४ मर्त्य × अमर
२७५ मलूल × टवटवीत
२७६ मवाल × जहाल
२७७ महान × क्षुद्र
२७८ महाल × झोपडी
२७९ मागचा × पुढचा
२८० माथा × पायथा
२८१ माया x द्वेष
२८२ मालक,धनी × चाकर, नोकर, सेवक, किंकर
२८३ माहेर × सासर
२८४ मिटलेले x उघडलेले
२८५ मित्र × शत्रू
२८६ मुख्य × गौण
२८७ मैत्री ×दुष्मनी, वैर
२८८ मोकळीक × निर्बंध
२८९ मोकळे × बंदिस्त
२९० मोठा x लहान
२९१ मोद × खन्त
२९२ मौन x बडबड
२९३ येईल x जाईल
२९४ रक्षक x मारक,भक्षक
२९५ राग x लोभ
२९६ रागीट × प्रेमळ
२९७ राजा × रंक
२९८ राव x रंक
२९९ रिकामेx भरलेले
३०० रुचकर x बेचव, सपक,रुचीहीन
३०१ रूक्ष × रमणीय
३०२ रूपवानx कुरूप
३०३ रेखीव x खडबडीत, ओबडधोबड
३०४ रेलचेल x टंचाई
३०५ रोख × उधार
३०६ रोड x सुदृढ
३०७ रोपटे x वृक्ष
३०८ लघू × गुरु
३०९ लठ्ठ x कृश, हडकुळा
३१० लय × प्रारंभ
३११ लवकर x उशिरा, सावकाश
३१२ लांब x आखूड, जवळ
३१३ लांबी x रुंदी
३१४ लाडके x नावडते
३१५ लाभ x हानी, नुकसान तोटा
३१६ वंद्य x निंद्य
३१७ वर × खाली
३१८ वर × वधू
३१९ वर, वरदान × शाप
३२० वरिष्ठ × कनिष्ठ
३२१ वाकडे x सरळ
३२२ विकास × ऱ्हास
३२३ विद्यार्थी × शिक्षक
३२४ विद्वान x अडाणी
३२५ विनंती × ताकीद
३२६ विपुलता x टंचाई
३२७ वियोग × संयोग,मिलन
३२८ विरुद्धर्धी × समानार्थी
३२९ विरोध × संमती, मान्यता, पाठिंबा
३३० विलंब x त्वरा, लगेच, तात्काल, पटकन
३३१ विशेष x सामान्य
३३२ वेगात x हळूहळू
३३३ व्यापक, विशाल × संकुचित
३३४ शंका × खात्री
३३५ शहर x खेडे
३३६ शहाणा x वेडा, मूर्ख, खुळा, अडाणी
३३७ शांत x तापट, रागीट
३३८ शाबाशकी x शिक्षा
३३९ शाश्वत × नश्वर
३४० शिकारी x सावज
३४१ शिखर x पायथा
३४२ शीघ्र × मंद
३४३ शीतल x उष्ण
३४४ शुक्ल x कृष्ण
३४५ शुद्ध x वद्य
३४६ शूर x भित्रा
३४७ शेंडा x बुडखा
३४८ श्रीमंत x गरीब, दरिद्री
३४९ श्रेष्ठ x कनिष्ठ
३५० संसारी x संन्यासी
३५१ सकाळ x संध्याकाळ
३५२ सक्ती × खुषी
३५३ सजीव × निर्जीव
३५४ सतर्क x बेसावध
३५५ सनातनी × सुधारक
३५६ सन्मान × अपमान
३५७ सम × विषम
३५८ समदर्शी × पक्षपाती
३५९ समृद्धी x दारिद्र्य
३६० समोर × मागे
३६१ सरळ × वाकडा, तिरका
३६२ सरस x निरस
३६३ सलोखा × भांडण
३६४ सवाल × जबाब
३६५ सान x थोर
३६६ सानुली x मोठी
३६७ सामुदायिक, सार्वजनिक x वैयक्तिक
३६८ साम्य x भेद, फरक
३६९ सार्थ × व्यर्थ
३७० सार्वजनिक x खाजगी
३७१ सावकार x भिकारी
३७२ सावकाश × पटकन
३७३ साहसी x भित्रा
३७४ सुंदर, रूपवान x कुरूप
३७५ सुख x दुःख
३७६ सुटका × अटक
३७७ सुबक × बेढब
३७८ सुरवात x शेवट
३७९ सुरेल x बेसूर
३८० सुवर्णयुग × तमोयुग
३८१ सुव्यवस्था x बंडाळी
३८२ सोपे x अवघड, कठीण
३८३ सोय × अडचण
३८४ सौजन्य x उद्धटपणा
३८५ सौम्य x भडक, भयंकर, प्रखर, तीव्र
३८६ स्तुती x निंदा
३८७ स्थिर × चंचल
३८८ स्थूल × सूक्ष्म,कृश
३८९ स्पष्ट × धूसर, फसवी
३९० स्वकीय × परका
३९१ स्वच्छ × घाणेरडा, गढूळ
३९२ स्वर्ग × नरक
३९३ स्वस्त × महाग
३९४ स्वस्थ× बेचैन
३९५ स्वहित, स्वार्थ × परमार्थ
३९६ स्वागत × निरोप
३९७ स्वाधीन x पराधीन
३९८ स्वीकार x अव्हेर
३९९ हर्ष × खेद
४०० हलकी × अवजड
४०१ हलके × जड, भारी, वजनदार
४०२ हळू, सावकाश x जलद
४०३ हसणे × रडणे
४०४ हसतमुख x रडततोंड
४०५ हसू x रडू
४०६ हार x जीत
४०७ हिम्मत x भय
४०८ हुशार x मठ्ठ, ढ
४०९ होकार x नकार
४१० होता × नव्हता
Share on Google Plus

About Vikas Dev

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.