Learn pronunciation of English Consonants

तुम्हाला इंग्रजी वाचता-लिहिता येते का? इंग्रजी वाचन-लेखन शिकायचे आहे का?

Do you want to learn to read and write English? But think tbat English is difficult language to learn read and write. Do you get stuck while making spelling of English words? But things English is difficult language to learn read and write. So this post is for you. Easy way to lean Engllish reading,writing and making spelling of any words in a blink of eyes. Here I have given pronunciation of English consonant and various conditions where pronunciation of the consonant change.

आजच्या या स्पर्धेच्या युगात इंग्रजी भाषा ही प्रत्येकाला अवगत असणे हे अत्यंत आवशयक झाले आहे. जगातील विविध विषयातील आधुनिक ज्ञान आणि तंत्रज्ञान हे इंग्रजी भाषेत अधिक प्रमाणात उपलब्ध आहे. विविध विषयांचा खजिना ज्यात दडलेला आहे अशी भाषा म्हणजे इंग्रजी. पण आपल्याला इंग्रजी भाषा येते का? हा कळीचा मुद्दा आहे. मोबाइल, टीव्ही, विविध अ‍ॅप, यूट्यूब विडिओझ यामुळे इंग्रजी भाषा मोठ्या प्रमाणात आपल्या कांनावरून जात आहे. मराठी भाषेत विविध इंग्रजी भाषेतील शब्द एकरूप झाले आहेत. त्यामुळे आपल्याला इंग्रजी भाषा बोललेली समजते. आणि काही प्रमाणात बोलता येते. पण इंग्रजी वाचन व लेखनाचे काय?

    अनेकांना किंवा अनेकांना म्हणण्यापेक्षा सर्वांनाच इंग्रजी वाचन व लेखन करतांना महत प्रयत्न करावे लागतात. कारण इंग्रजी भाषेचे स्परूप. मराठी, हिन्दी अथवा इतर भारतीय भाषांप्रमाणे इंग्रजी मध्ये एका अक्षराला एकच उच्चार किंवा एका उच्चारला एकच अक्षर नाही. म्हणजे या भाषेत एका अक्षराला एका पेक्षा अधिक उच्चार आहे. जसे c- 'c' चा उच्चार 'स' होतो तसेच 'क' सुद्धा होतो. तो केव्हा 'क' होतो आणि केव्हा 'स' हे कळल्यास इंग्रजी वाचन-लेखन अधिक सोपे होईल. तसेच इंग्रजी भाषेत एका उच्चारा करिता एकापेक्षा अधिक अक्षरे आहेत. जसे 'फ' या उच्चारा करिता 'f ' आणि  'ph' हे दोन्ही अक्षरांचा वापर करण्यात येतो.

    सदर पोस्ट मध्ये इंग्रजीतील विविध consonants म्हणजे व्यंजनांचा उच्चार काय होतो. कोणत्या प्रसंगी, ठिकाणी काय होतो ते येथे दिलेले आहे. इंग्रजी मध्ये एकूण ५ स्वर (vowel letter) आणि २१ व्यंजन अक्षरे (consonant letter) असले तरी एकूण स्वर उच्चार (vowel sound) २० आणि व्यंजन उच्चार (consonant sound) २४ आहेत. याचीच माहिती येथे देण्यात आलेली आहे.

English consonant and their pronunciation (इंग्रजी व्यंजनांचा उच्चार)

b चा उच्चार (pronuciation of b)

'b' चा उच्चार 'ब' होतो.

  • ball - बॉल
  • bat - बॅट
  • book - बूक
  • bed - बेड
  • bench - बेंच
  • big - बिग
  • box - बॉक्स
  • bull - बुल
  • bill - बिल

'bl' चा उच्चार: 'b' चा उच्चार 'ब' आणि 'l' चा 'ल' म्हणून 'bl' चा उच्चार 'ब्ल' होतो.

  • black - ब्लॅक
  • block - ब्लॉक
  • blossom - ब्लॉसम्
  • blouse - ब्लाउज़्
  • blink - ब्लिंक
  • bleed - ब्लीड
  • blame - ब्लेइम्
  • blanket - ब्लैङ्किट्
  • bless - ब्लेस

'br'चा उच्चार: 'b' चा उच्चार 'ब' आणि 'r' चा 'र' म्हणून 'br' चा उच्चार 'ब्र' होतो.

  • brass - ब्रास
  • bread - ब्रेड
  • brain - ब्रेन
  • zebra - ज़ेब्रअ
  • cobra - कोब्रा
  • branch - ब्रांच
  • brave - ब्रेइव्ह
  • breath - ब्रेथ
  • brick - ब्रिक्

'c' चा उच्चार (pronuciation of 'c')

'c' चे दोन उच्चार होतात 'स' आणि 'क'. 'c' च्या पुढे e,i,y असल्यास उच्चार 'स' होतो. म्हणजे ce, ci, cy असल्यास उच्चार 'स' असा होतो.

  • cent - सेंट
  • centre - सेन्टर
  • cement - सीमेंट
  • centimeter - सेन्टिमीटर
  • century - सेन्चरी
  • ceremony - सेरिमनी
  • certain - सर्टन
  • cell - सेल
  • cereals - सिअरीअल्
  • city - सिटि
  • cinema - सिनिमा
  • cigar - सिगार
  • circuit - सर्किट
  • cite - साइट्
  • citizen - सिटिज़न्
  • circus - सर्कस
  • circle - सर्कल
  • civil - सिव्हल
  • cyst - सिस्ट्
  • cycle - सायकल
  • cygnet - सिग्नट
  • cynic - सिनिक्
  • cymes - साइम
  • cypress - साइप्रस
  • cylinder - सिलिंडर
  • cyclone - साइक्लअउन्
  • cypher - साइफर

'c' च्या पुढे e,i आणि y व्यतिरिक्त इतर कोणतेची अक्षर असल्यास 'c' चा उच्चार 'क' होतो.

  • cat - कॅट
  • call - कॉल
  • cap - कॅप
  • car - कार
  • cable - केबल
  • camel - कॅमल
  • cake - केइक
  • cage - केइज
  • calendar - कलेंडर
  • come - कम
  • cot - कॉट
  • cow - काऊ
  • cock - कॉक
  • coconut - कोकोनट
  • copper - कॉपर
  • coal - कोल
  • cobra - कोब्र
  • cool - कूल
  • cup - कप
  • cut - कट
  • cucumber - कुकुम्बर
  • cupboard - कपबर्ड
  • cure - क्यूअर
  • cube - क्यूब
  • curry - करी
  • cuckoo - कुकू
  • cub - कब

'ch' चा उच्चार 'च' होतो.

  • chalk - चॉक
  • chair - चेअर
  • chest - चेस्ट
  • church - चर्च
  • chocolate - चॉक्लेट
  • chick - चिक
  • chat - चॅट
  • cherry - चेरी
  • chess - चेस

'cl' चा उच्चार: 'c' चा उच्चार 'क' आणि 'l' चा 'ल' म्हणून 'cl' चा उच्चार 'क्ल' होतो.

  • class - क्लास
  • clap - क्लॅप
  • clock - क्लॉक
  • clever - क्लेव्हर
  • cluster - क्लस्टर
  • clip - क्लिप
  • clear - क्लियर
  • cloth - क्लॉथ
  • climb - क्लाइंब

'cr' चा उच्चार: 'c' चा उच्चार 'क' आणि 'r' चा 'र' म्हणून 'cr' चा उच्चार 'क्र' होतो.

  • crow - क्रो
  • cream - क्रीम
  • cry - क्राई
  • crane - क्रेन
  • crime - क्राइम
  • crust - क्रस्ट
  • cricket - क्रिकेट
  • crown - क्राउन
  • crude - क्रूड

d चा उच्चार (pronuciation of d)

'd' चा उच्चार 'ड' होतो.

  • doll - डॉल
  • dog - डॉग
  • dig - डिग
  • dead - डेड
  • date - डेइट
  • dust - डस्ट
  • dam - डॅम
  • dance - डांस
  • dull - डल
'dr' चा उच्चार: 'd' चा उच्चार 'ड' आणि 'r' चा 'र' म्हणून 'dr' चा उच्चार 'ड्र' होतो.
  • dragon - ड्रॅगन
  • dress - ड्रेस
  • drill - ड्रिल
  • dry - ड्राय/ड्राइ
  • drum - ड्रम
  • drive - ड्राइव
  • drink - ड्रिंक
  • drone - ड्रोन
  • drug - ड्रग
'd' च्या पुढे 'y' असल्यास उच्चार 'डाय' किंवा 'डि' होतो.
  • dye - डाई
  • dyspnea - डिस्पनीअ
  • dying - डाइंग
  • dynamite - डायनामाइट
  • dysphonic -डिस्फोनिक
  • dybbuk - डीबक
  • dynamic - डायनॅमिक
  • dynamo - डायनॅमो
  • dynast - डिनॅस्ट

'f' चा उच्चार (pronuciation of 'f')

'f' चा उच्चार 'फ' होतो.
  • fable-फॅबल
  • fan-फॅन
  • fish-फिश
  • fist-फिस्ट
  • folder-फोल्डर
  • funny-फनी
  • February - फेब्रुवरी
  • fee - फी
  • food - फूड
'fl' चा उच्चार: 'f' चा उच्चार 'फ' आणि 'l' चा 'ल' म्हणून 'fl' चा उच्चार 'फ्ल' होतो.
  • flag -फ्लॅग
  • flat -फ्लॅट
  • flood -फ्लड
  • flower -फ्लॉवर
  • flight-फ्लाइट
  • flush- फ्लश
  • flee -फ्ली
  • flesh -फ्लेश
  • flu -फ्लू
fr चा उच्चार: 'f' चा उच्चार 'फ' आणि 'r' चा 'र' म्हणून 'fr' चा उच्चार 'फ्र' होतो.
  • fracture-फ्रॅक्चर
  • frame-फ्रेइम
  • Friday-फ्रायडे
  • friend-फ्रेंड
  • frog-फ्रॉग
  • freek-फ्रीक
  • free-फ्री
  • freeze-फ्रीज
  • fruit- फ्रूट

'g' चा उच्चार (pronuciation of 'g')

'g' च्या पुढे 'a' असल्यास 'g' चा उच्चार 'ग' होतो.
  • gala-गाला
  • game- गेइम
  • garden-गार्डन
  • gate-गेइट
  • gay-गे
  • gaze-गेइज
  • gale-गेइल
  • gas-गॅस
  • gang-गॅंग
'g' च्या पुढे 'e' व त्या नंतर 'l' ते 's' पर्यंतचे अक्षर 'ज' उच्चार होतो.
  • gem - जेम
  • generator - जनरेटर
  • geography - जिऑग्रफि
  • gelatin - जेलटीन
  • gentleman - जेंटलमॅन
  • geometry - जिऑमिट्रि
  • genie - जींनि
  • germ - जर्म
  • gentle - जेंटल
exception : काही शब्द या नियमाला अपवाद आहे. जसे-
  • Gestapo-गेस्टापो
  • geld-गेल्ड
'g' च्या पुढे 'e' व त्या नंतर 'a' ते 'i' पर्यंतचे अक्षर आणि 't' ते 'z' पर्यंतचे अक्षर असल्यास 'ग' उच्चार होतो. पण यावरील शब्द कमी आहेत.
  • gear-गियर
  • geese-गीस
  • geisha-गेइश
  • get-up-गेट-अप
  • geyser-गीझर
  • geezer-गीझर
  • gewgaw-ग्यूगॉ
  • get-गेट
  • gecko-गेको
exception: या नियमाला काही शब्द अपवाद आहे. जसे-
  • gee up -जीअप
  • gee-gee-जीजी
'g' च्या पुढे 'i' असल्यास उच्चार 'ग' किंवा 'ज' होतो.
  • ginger -जिंजर
  • giraffe -जिराफ
  • girl -गर्ल
  • give -गिव्ह
  • give-up -गिव्हअप
  • gin-जिन
  • giant-जायंट
  • gift-गिफ्ट
  • gilt-गिल्ट
'g' च्या पुढे 'u' असल्यास 'ग' उच्चार होतो.
  • gun-गन
  • gust-गस्ट
  • guy-गाय
  • guide-गाइड
  • gunpowder -गनपाऊडर
  • guilt-गिल्ट
  • gum-गम
  • gutter-गटार
  • guitar-गिटार
'g' च्या पुढे o असल्यास -'ग' उच्चार होतो.
  • go-गो
  • gold-गोल्ड
  • goal-गोल
  • goggle -गॉगल
  • goof-गूफ
  • goose-गूस
  • goat-गोट
  • God-गॉड
  • good-गुड
'gh' चा उच्चार इंग्रजी मध्ये 'घ' हा न होता 'ग' होतो.
  • ghee-गी
  • ghost-गोस्ट
  • ghoulish-गुलिश
  • gherkin-गर्किन
  • ghetto-गेटअउ
  • ghostly-गोस्टलि
  • ghoul-गुल
  • ghastly-गास्ट्ली
'gl' चा उच्चार: 'g' चा उच्चार 'ग' आणि 'l' चा 'ल' म्हणून 'gl' चा उच्चार 'ग्ल' होतो.
  • glad-ग्लॅड
  • glass-ग्लास
  • glider-ग्लायडर
  • glee-ग्ली
  • glucose -ग्लूकअउज़्
  • glow -ग्लोव
  • glory-ग्लोरी
  • globe-ग्लोब
  • glue-ग्लू
'gn' मध्ये 'g' silent असल्यामुळे 'gn' चा उच्चार 'ग्न' होत नाही तर 'gn' चा उच्चार 'न' होतो.
  • gnome-नोम
  • gnash-नॅश
  • gnomon-नोमॉन
  • gnarly-नार्लि
  • gnaw-नॉ
  • gnosis-नोसिस
  • gnu-नू
  • gnat-नॅट
gr चा उच्चार: 'g' चा उच्चार 'ग' आणि 'r' चा 'र' म्हणून 'gr' चा उच्चार 'ग्र' होतो.
  • grade-ग्रेड
  • grace-ग्रेस
  • green-ग्रीन
  • grip-ग्रीप
  • groom-ग्रूम
  • group-ग्रुप
  • grain-ग्रइन
  • gram-ग्राम
  • ground-ग्राऊंड
'gy' चा उच्चार 'जि' होतो.
  • gym-जिम
  • gypsy-जिप्सी
  • gymnasium -जिम्नेशीअम
  • gymkhana-जिमकान/- जिमखाना
  • gyro-जाइरो
  • gypsum -जिप्सम
  • gyp-जिप
अपवाद gynecology -गायनोकोलॉजी

'h' चा उच्चार (pronuciation of 'h')

'h' चा उच्चार 'ह' होतो.
  • hat -हॅट
  • hall- हॉल
  • hurt -हर्ट
  • high -हाय
  • hippo -हिप्पो
  • hut -हट
  • head- हेड
  • herb- हर्ब
  • home- होम

'j' चा उच्चार (pronuciation of 'j')

'j' चा उच्चार 'ज' होतो.
  • jam -जॅम
  • jail -जेल
  • jingle -जिंगल
  • joker -जोकर
  • judo -जुडो
  • jungle -जंगल
  • jeans -जीन्स
  • jet -जेट
  • juice -ज्यूस

'k' चा उच्चार (pronuciation of 'k')

'k' चा उच्चार हा 'क' होतो, पण त्याच प्रमाणे 'c' च्या पुढे a,o, आणि u असल्यास त्याचाही उच्चार 'क' होतो. म्हणून 'k' समोर a,o, आणि u येतील असे शब्द फार कमी आहेत. आणि जास्त करून ते परकीय भाषेतील आहेत.
  • Kangaroo -कॅंगरू
  • kodak -कोडॅक
  • kurta -कुर्त/कुर्ता
  • kumkum -कुमकुम
  • kukri- कुक्री
  • kumera -कुमारा
  • koran - कॉरान
  • kowtow - काउटाउ
  • key -की
  • kettle-केटल
  • ken -केन
  • kerosene केरसीन
  • keen कीन
  • keg केग
  • ketchup -केचप
  • keep -कीप
  • keel -कील
  • kit -किट
  • kitchen -किचन
  • kite -काइट
  • kind -काइंड
  • kidney -किडनी
  • king- किंग
  • kick -किक
  • kill -किल
  • kilo -किलो
kn चा उच्चार: 'kn' मध्ये 'k' silent असल्याने 'k' चा उच्चार होत नाही म्हणून 'kn' चा उच्चार 'क्न' न होता 'न' होतो.
  • knot-नॉट
  • knife-नाइफ
  • knee-नी
  • kneecap-नीकॅप
  • knight-नाइट
  • knowledge-नॉलेज
  • knock-नॉक
  • knag-नॅग
  • knell -नेल

'l' चा उच्चार (pronuciation of 'l')

'l' चा उच्चार 'ल' होतो.
  • lamp-लॅम्प
  • lake-लेइक
  • like-लाइक
  • light-लाइट
  • lock -लॉक
  • luck -लक
  • leaf-लीफ
  • let -लेट
  • look -लूक

'm' चा उच्चार (pronuciation of 'm')

'm' चा उच्चार 'म' होतो.
  • man -मॅन
  • mat -मॅट
  • milk-मिल्क
  • miss -मिस
  • moon -मून
  • murder -मर्डर
  • market-मार्केट
  • merry -मेर्रि
  • mother- मदर

'n' चा उच्चार (pronuciation of 'n')

'n' चा उच्चार 'न' होतो.
  • name-नेइम
  • near -नियर
  • night -नाइट
  • no -नो
  • nick-निक
  • nut-नट
  • net -नेट
  • neck -नेक
  • nurse -नर्स

'p' चा उच्चार (pronuciation of 'p')

'p' चा उच्चार 'प' होतो.
  • pant - पॅंट
  • pan - पॅन
  • pond - पोंड
  • post - पोस्ट
  • pink - पिंक
  • punch - पंच
  • pen - पेन
  • Pencil - पेन्सिल
  • pill- पिल
pl चा उच्चार: 'p' चा उच्चार 'प' आणि 'l' चा 'ल' म्हणून 'pl' चा उच्चार 'प्ल' होतो.
  • plast -प्लास्ट
  • plan -प्लॅन
  • plot -प्लॉट
  • plant -प्लांट
  • plastic-प्लॅस्टिक
  • plight-प्लाइट
  • please -प्लीज
  • play -प्ले
  • plum -प्लम
pr चा उच्चार: 'p' चा उच्चार 'प' आणि 'r' चा 'र' म्हणून 'pr' चा उच्चार 'प्र' होतो.
  • pray -प्रे
  • prank -पॅंक
  • prison -प्रिझन
  • promise -प्रॉमिस
  • product -प्रॉडक्ट
  • prince -प्रिन्स
  • press -प्रेस
  • pressure -प्रेशर
  • prune -प्रून
'ps' चा उच्चार: 'ps' ने सुरू होणार्‍या शब्दांमधील 'p' silent असतो म्हणून 'ps' चा उच्चार 'स' होतो.
  • psalm साम
  • psychology -सायकॉलजि
  • pseudonym -स्युडनिम
  • pseudo -स्यूडों
  • psyche -साइकि

'q' चा उच्चार (pronuciation of 'q')

'q' चा उच्चार 'क्व' होतो.
  • quake -क्वेक
  • quality -क्वालिटी
  • query -क्विअरि
  • question -क्वेस्चन
  • quiet -क्वायट
  • quote -क्वअउट्
  • queen -क्वीन
  • quick -क्विक
  • quite -क्वाइट

'r' चा उच्चार (pronuciation of 'r')

'r' चा उच्चार 'र' होतो.
  • rat -रॅट
  • rabbit -रॅबिट
  • rude- रुड
  • ruler -रूलर
  • ring -रिंग
  • reach -रीच
  • rod -रॉड
  • road -रोड
  • rich -रिच

's' चा उच्चार (pronuciation of 's')

's' चा उच्चार 'स' होतो.
  • sack - सॅक
  • sand - सॅंड
  • soon - सून
  • surf - सर्फ
  • sea - सी
  • song - सोंग
  • Saturday - सॅटर्डे
  • sun - सन
  • see - सी
'sc' चा उच्चार:'sc' 's' चा उच्चार 'स' आणि 'sc' च्या पुढे a, o, u आल्यास उच्चार 'स्क' होतो. कारण 's' चा उच्चार 'स' आणि 'c' पुढे a, o, u असल्यास 'c' चा उच्चार 'क' होतो.
  • scar - स्कार
  • scarf - स्कार्फ
  • scout - स्काउट
  • scooter - स्कूटर
  • scurf- स्कर्फ
  • scorn - स्कॉन्
  • school - स्कूल
  • scold - स्कोल्ड
  • scarlet - स्कालट्
's' चा उच्चार 'स' आणि 'c' च्या पुढील अक्षर e, i , किंवा y असल्यास 'c' चा उच्चार 'स' होतो. म्हणूनच 'sc' च्या पुढे 'e, i , y' आल्यास 'sc' उच्चार 'स' होतो
  • scythe- साइद
  • Scylla -सिल
  • ascent - असेंट
  • scenes - सीन्स
  • scent - सेंट
  • fluorescent -
  • disciple - डिसिपल
  • science - सायन्स
  • conscious - कॉनशियस
's' चा उच्चार 'स' 'c' चा 'क' आणि 'r' चा उच्चार 'र' होतो. म्हणून 'scr' चा उच्चार 'स्क्र' होतो.
  • scratch -स्क्रॅच
  • screen -स्क्रीन
  • scrub-स्क्रब
  • screw-स्क्रू
  • screech -स्क्रीच
  • scruff स्क्रफ
  • script -स्क्रिप्ट
  • scroll-स्क्रोल
  • scratch -स्क्रच
'sh' चा उच्चार 'श' होतो.
  • shake-शेइक
  • shall-शाल
  • shield-शिल्ड
  • sheep-शीप
  • shock -शॉक
  • shut-शट
  • shape-शेइप
  • ship -शिप
  • shoot- शूट
'shr' चा उच्चार 'श्र' होतो कारण 'sh' चा उच्चार 'श' आणि 'r' चा उच्चार 'र' होतो.
  • shrapnel - श्रॅपनल
  • shrift -श्रीफ्ट
  • shrink -श्रिंक
  • shroff -श्रोफ
  • shroud -श्रौड
  • shrine- श्राइन
  • shrike -श्रिक
  • shrub -श्रब
  • shrubbery- श्रबरि
's' चा उच्चार 'स' आणि 'k' चा 'क' त्यामुळे 'sk' चा उच्चार 'स्क' होतो.
  • skate-स्केइट
  • skeleton -स्केलिटन
  • skirt- स्कर्ट
  • skull-स्कल
  • sky -स्काय
  • skeptic-स्केप्टिक
  • skit-स्किट
  • ski - स्की
  • sko वरुण शब्द नाहीत.
's' चा उच्चार 'स' आणि 'l' चा 'ल' त्यामुळे 'sl' चा उच्चार 'स्ल' होतो.
  • slang- स्लॅङ्ग
  • slash-स्लॅश
  • slice- स्लाईस
  • slip-स्लिप
  • slope- स्लोप
  • slum -स्लम
  • sleep - स्लीप
  • sleeve - स्लीव्ह
  • slow - स्लो
's' चा उच्चार 'स' होतो आणि 'm' चा उच्चार 'म' म्हणूनच 'sm' चा उच्चार 'स्म' होतो.
  • smash - स्मॅश
  • smell - स्मेल
  • smile - स्माईल
  • smug - स्मग
  • smoking -स्मोकिंग
  • small - स्मॉल
  • smith - स्मिथ
  • smoke - स्मोक
  • smut - स्मट
's' चा उच्चार 'स' व 'n' चा उच्चार 'न' होत असल्याकारणाने 'sn' चा उच्चार 'स्न' करावा.
  • snake - स्नेइक
  • snail - स्नेइल
  • snip - स्निप
  • snow - स्नो
  • snuff- स्नफ
  • snook -स्नूक
  • sneer -स्निअर
  • snick-स्निक
  • snug-स्नग
'sp' चा उच्चार 'स्प' करावा कारण की आपण पहिलेच आहे 's' चा उच्चार 'स' होतो आणि 'p' चा उच्चार 'प' होतो.
  • spa - स्पा
  • space - स्पेइस
  • spicy - स्पाइसी
  • spectacle - स्पेक्टकल
  • spider - स्पाइडर
  • sputum - स्पुटम
  • speak - स्पीक
  • special - स्पेशल
  • spur - स्पर
आपण वर अभ्यासलेच आहे की 'sp' चा उच्चार 'स्प' होतो आणि त्याला 'r' म्हणजेच 'र' जोडवे. त्यायोगे 'spr' चे वाचन 'स्प्र' करावे.
  • sprag- स्प्रग
  • spray - स्प्रे
  • spring -स्प्रिंग
  • sprit- स्प्रिट
  • spry -स्प्राइ
  • sprite - स्प्राइट
  • spread- स्प्रेड
  • spree -स्प्री
  • sprout -स्प्राउट
's' चा 'स' आणि 't' चा 'ट' उच्चार होत असल्याकारणाने 'st' चे वाचन 'स्ट' करावे.
  • stable - स्टेइबल्
  • stag - स्टॅग
  • steel - स्टील
  • stone - स्टोन
  • stop - स्टॉप
  • student - स्टुडेंट
  • stair - स्टेअर
  • steam - स्टीम
  • stump - स्टंप
आपण वर पहिल्या प्रमाणे 'st' चे वाचन 'स्ट' आणि त्याल 'r' म्हणजेच 'र' जोडून 'str' चा उच्चार 'स्ट्र' होतो.
  • straight -स्ट्रेट
  • strain -स्ट्रेन
  • string- स्ट्रिंग
  • street -स्ट्रीट
  • strict- स्ट्रीक्ट
  • strong -स्ट्रॉंग
  • strait -स्ट्रेइट
  • strange -स्ट्रेइन्ज
  • struma -स्ट्रम
's' चा उच्चार 'स' होतो आणि 'q' चा उच्चार 'क्व' म्हणूनच 'sq' चा उच्चार 'स्क्व' होतो.
  • square -स्क्वेअर
  • squad - स्क्वॉड
  • squid- स्क्विड
  • squeal - स्क्विल
  • squirm - स्क्वर्म
  • squire - स्क्वाइअर
  • squeeze - स्क्विझ
  • squirrel - स्विरल
  • squirt - स्क्वर्ट
's' चा उच्चार 'स' होतो आणि 'w' चा उच्चार 'व' म्हणूनच 'sw' चा उच्चार 'स्व' होतो.
  • swag - स्वॅग
  • swan - स्वॉन
  • sword - स्वर्ड
  • switch - स्विच
  • swim- स्विम
  • swat - स्वॉट
  • swear - स्वेअर
  • sweet - स्वीट
  • swum - स्वम
'sy' चा उच्चार 'सि' किंवा 'साई' होतो.
  • system - सिस्टम
  • symphony - सिम्फनी
  • symmetry - सिमीट्री
  • syn - सिन
  • syllabus - सिलबस
  • sylph - सिल्फ
  • syndicate - सिंडिकीट
  • syphon - साईफन

't' चा उच्चार (pronuciation of 't')

't' चा उच्चार 'ट' होतो.
  • table -टेबल
  • tap-टॅप
  • toast-टोस्ट
  • tiny-टायनी
  • tire-टायर
  • tub-टब
  • team-टीम
  • teeth-टीथ
  • tune-ट्यून
ture ही अक्षरे शब्दाच्या शेवटी येतात त्याचा उच्चार जाणून घेतल्यास 'ture' अक्षर असलेल्या शब्दांचे वाचन करणे सोपे जाईल. 'ture' चे वाचन 'चर' असे करावे.
  • nature -नेचर
  • future-फ्युचर
  • culture -कल्चर
  • vulture-वव्हल्चर
  • gesture-जेस्चर
  • feature-फ़ीचर
  • lecture -लेक्चर
  • fracture -फ्रॅक्चर
  • moisture मॉइस्चर
'th' चा उच्चार 'थ' आणि कधीकधी 'द' होतो.
  • thank-थॅंक
  • three-थ्री
  • thick-थिक
  • thing-थिंग
  • think-थिंक
  • thousand थाऊजंड
  • thirst-थ़अस्ट्
  • thin-थिन
  • thief -थिफ
'th' चा उच्चार 'द' होत असलेले शब्द.
  • the-द/दी
  • than-दॅन
  • these-द़ीज़्
  • their-देअर
  • them-देम
  • tho -दो
  • that-दॅट
  • there-देअर
  • though-द़्अउ
  • thee-दी
  • those-दोज
  • they- दे
  • thither -दिदर
  • words which contain-'there' as prefix -ex. Therefore etc
'thr' चा उच्चार थ्र होतो.
  • throw-थ्रो
  • thread -थ्रेड
  • thrill -थ्रिल
  • throat-थ्रोट
  • throb-थ्रोब
  • thrust-थ्रस्ट
  • thrash-थ्रॅश
  • three -थ्री
  • thrush-थ्रश
't' चा उच्चार 'ट' आणि 'r' चा 'र' होतो म्हणून 'tr' चा उच्चार 'ट्र' होतो.
  • tractor -ट्रॅक्टर
  • traffic -ट्रॅफिक
  • troll -ट्रोल
  • triple -ट्रीपल
  • trim -ट्रिम
  • trunk- ट्रक
  • train -ट्रेन
  • trap -ट्रप
  • try-ट्राय/ ट्राइ
tw चा उच्चार 'ट्व' होतो.
  • twee-ट्वी
  • twice-ट्वाइस
  • twit-ट्विट
  • twaddle-ट्वाडल
  • tweet-ट्वीट
  • twopene-टपन्स
  • twist - ट्विस्ट
  • twin - ट्विन
  • two - टू
'ty' चा उच्चार 'टाइ किंवा टि' होतो.
  • tycoon -टाइकून
  • type-टाइप
  • typical-टिपिकल
  • tympan-टिम्पन
  • tyranny-टिरनी
  • tyrant-टाइरंट
  • typhoon-टाइफून
  • typhus-टाइफस
  • tyro-टाइरो

'v' चा उच्चार (pronuciation of 'v')

'v' चा उच्चार 'व किंवा व्ह' होतो.
  • vegetable - वेजीटेबल/व्हेजीटेबल
  • valve - वाल्व्ह
  • virus - वायरस
  • villain - व्हिलन/विलन
  • viper - व्हाइपर/वायपर
  • vulgar - वल्गर
  • vender - व्हेंडर/वेंडर
  • vim - व्हिम
  • vowel - व्हाउअल/वॉवेल

'w' चा उच्चार (pronuciation of 'w')

'w' चा उच्चार 'व' होतो.
  • waist-वेस्ट
  • walk-वॉक
  • well -वेल
  • wicket -विकेट
  • wife-वाइफ
  • wolf -वुल्फ
  • wall -वॉल
  • we -वी
  • word -वर्ड
'wh' चा उच्चार 'व्ह' होतो.
  • what - व्हॉट
  • wheel - व्हील
  • wheat - व्हीट
  • why - व्हाय/व्हाइ
  • white - व्हाइट
  • where - व्हेअर
  • whistle - व्हीसल
  • when - व्हेन
  • whale - व्हेल
some exception: काही शब्दांमध्ये 'wh' चा उच्चार हा 'व्ह' न होता 'ह' होतो.
  • who -हू
  • whoop -हूप्
  • whose हूज
  • wholesale-होलसेल
  • wholly-होल्ली
  • whom -हूम
  • whole-होल
'wor' उच्चार 'वर्' असा होतो
  • work - वर्क
  • worry - वरी
  • word - वर्ड
  • worst - वोर्स्ट
  • worth - वोर्थ
  • worship - वअशिप्
  • worm - वर्म
  • world - वर्ल्ड
  • worthy - वर्दि
wr चा उच्चार: 'wr' मध्ये 'w' हा silent असतो त्यामुळे 'w' चा उच्चार होत नाही त्यामुळेच 'wr' चा उच्चार 'र' होतो.
  • wrap - रॅप
  • wrestle - रेसल
  • wroth - रोथ
  • wry - राइ
  • write - राइट
  • written - रिटन
  • wrong - रॉन्ग
  • wrist - रिस्ट
  • wrote - रोट

'x' चा उच्चार (pronuciation of 'x')

'x' शब्दाच्या सुरूवातीस असल्यास उच्चार 'झ' होतो.
  • xerox - झेरॉक्स/झिअरॉक्स
  • xenophobia - झेनोफोबीअ
  • xyst - झिस्ट
  • xenon - झेनॉन
  • xenophobia - झेनफोबिअ
some-exceptions: x हा शब्दापासून भिन्न असल्यास 'x' चा उच्चार 'क्स' होतो.
  • x-mas - एक्स मस
  • x-man - एक्स मॅन
  • x-ray - एक्स रे
x-इतरत्र असल्यास उच्चार 'क्स' होतो.
  • box - बॉक्स
  • fox - फोकस
  • relax - रीलॅक्स
  • max - मॅक्स
  • wax - वॅक्स
  • ox - ऑक्स
  • example - एक्झॅम्पल
  • fax - फॅक्स
  • taxi - टॅक्सी

'y' चा उच्चार (pronuciation of 'y')

'y' चा उच्चार 'य' होतो.
  • yak - याक
  • yellow -येलो
  • yoga -योग
  • yo-yo-योयो
  • you -यू
  • yummy-यमि
  • year -यिअर
  • yes-येस
  • yippee-यीप्पी
'y' शब्दाच्या शेवटी असल्यास उच्चार 'ई' किंवा 'वेलांटी' होते.
  • cherry -चेरी
  • happy - हॅप्पी
  • my - माय/माई
  • toy - टॉय/टॉइ
  • boy - बॉय/बॉइ
  • oily - ऑइली
  • dolly - डॉली
  • rainy - रेंनी
  • say - से/सेइ

'z' चा उच्चार (pronuciation of 'z')

'z' चा उच्चार 'झ' होतो.
  • zebra - जीब्र
  • zero - झिअरो
  • zombie - झॉम्बि
  • zone - झोन
  • zigzag - झिगझॅग
  • zinc - झिंक
  • zoo - झू
  • zip - जिप
  • zebu - झिबू


click here to download the file in pdf form.
Share on Google Plus

About Vikas Dev

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment

3 Comments:

अनामित म्हणाले...

Good job sir.

अनामित म्हणाले...

Hello sir, thank you so much for creating such type of blogs.
Will you provide pdf of this??

Vikas Dev म्हणाले...

Thank you. I will update the post and attach pdf file to the post.